शिवसेनेच्या वतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभाला अभिवादन

नेशन न्यूज मराठी टीम.

संभाजीनगर/प्रतिनिधी – निझामाच्या तावडीतून मराठी माणसाला सोडवण्यासाठी अनेकांनी प्राणाची बाजी लावली. त्यांच्यासाठी केवळ आजचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केवळ अर्धा तास येऊन कार्यक्रमाला छोटे स्वरूप देऊन गेले. आतापर्यंत इतिहासात नेहमी ९ वाजेपर्यंतची परंपरा कायम होती. यावेळी कुठल्याही ठोस घोषणा न करता कागदोपत्री भाषण करत त्यांनी मराठवाड्याच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला.या परंपरेला छेद दिल्याचा निषेध करत शिवसेनेने सिद्धार्थ उद्यान येथील मराठवाडा मुक्तीसंग्राम स्तंभास अभिवादन केले.

या लढ्यातील शूरवीरांना पुष्कचक्र वाहून शिवसैनिक नतमस्तक झाले.यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी महापौर नंदकुमार घोडेले, भाकासे सरचिटणीस प्रभाकर मते पाटील, महिला संपर्कसंघटक सुनीता आऊलवार, सहसंपर्क संघटक सुनीता देव, जिल्हा संघटक प्रतिभा जगताप, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, बंडू ओक, आनंद तांदुळवाडीकर, गणू पांडे, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, उपशहरप्रमुख मकरंद कुलकर्णी, माजी नगरसेवक किशोर नागरे, कमलाकर जगताप, हिरालाल सलामपुरे, अमित वाहुल, तुकाराम सराफ, सोपान बांगर, नारायण कानकाटे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक अंजली मांडवकर, जयश्री लुंगारे, विधानसभा संघटक मीरा देशपांडे, शहर संघटक आशा दातार, विद्या अग्निहोत्री, सुचिता आंबेकर, कविता सुरळे, रेणुका जोशी, अलका कांदे, सीमा गवळी, शोभा साबळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web