कल्याणातील विजय तरुण मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांची कारवाई

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण मधील विजय तरुण मंडळाने यंदा गणेशोत्सवादरम्यान शिवसेनेतील बंडखोरीबाबत चलचित्र देखावा तयार केला होता. हा देखावा चर्चेचा विषय ठरला होता . या देखाव्याला पोलिसांनी आक्षेप घेत या देखाव्यावर आज पहाटेच्या सुमारास कारवाई करत देखाव्याची सामुग्री जप्त केली. .

या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी यांनी असे सागितले की मंडळतर्फे प्रत्येक वर्षी वर्षातील महत्वाच्या घडामोडी वर देखावा साकारला जातो , यंदाच्या संघटना फुटली आहे यावर देखावा साकारण्यात आला होता ,देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हत ,पहाटेच्या सुमारास कारवाई केली ही हिटलरशही आहे ,आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार असून या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नसल्याचे सांगितले .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web