अंधश्रद्धेमुळे महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी जनजागृती करण्याचे राज्य महिला आयोगा कडून आवाहन

नेशन न्युज मराठी टिम.

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून महिलांवर तसेच मुलींवर जादूटोण्याच्या माध्यमातून अत्याचार केल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुलीच्या शरीरात दुष्ट आत्म्याने प्रवेश केला आहे असे मांत्रिकाने सांगितले. तसेच तिला जीवे मारण्याचा देखील सल्ला दिला यावरून आपल्या पोटच्या सहा वर्षीय मुलीची हत्या केलीगेली.तसेच औरंगाबाद येथे एक भोंदूबाबा डोक्यावर हात ठेऊन आजार बरे करतो असे सांगत अनेक महिलांवर अत्याचार करण्यात आला असल्याचा देखील प्रकार उघडकीस आला आहे.

तसेच पुण्यामध्ये पुत्र प्राप्तीसाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरून एका महिलेस तिच्या पती, सासू आणि सासऱ्याने सर्वांसमक्ष अंघोळ करायला लावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी या पीडितेच्या पती, सासू , सासरे यांना अटक झाली होती आणि नंतर फरार असलेल्या मांत्रिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे.या सर्व घटना या महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत आणि पुरोगामी राज्याची मान खाली घालायला लावणाऱ्या आहेत. यावरती महाराष्ट्र राज्य महिला आयोग योग्य ती कारवाई केली आहे व करत राहणारच परंतु या सर्व घटना का घडत आहेत याचा विचार करणे गरजेचे आहे.

महिलांवरील अत्याचाराचे मूळ हे समाजात असलेली अंधश्रद्धा आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी आपले मत व्यक्त करताना संगितले. पण आशा वाईट घटना घडूच नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. अशा घटनेचे समूळ कारण नष्ट करणे ही तुमची, आमची आणि सर्वांचीच प्रमुख जबाबदारी आहे. असेही त्या म्हनाल्या, पुढे त्या म्हनाल्या की या बाबतीत महाराष्ट्र राज्य महिला आयोग गांभीर्यपूर्वक विचार करत असून अशा अंधश्रद्धेमुळे महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी व्हावे व समाजातील अशा मानसिकतेत बदल घडविण्यासाठी जनजागृतीची फार आवश्यकता आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगानी याची गंभीर दखल घेतली आहे.समाजातील प्रत्येक घटकासह अंधश्रद्धा निर्मूलन समितीला अशा मुद्द्यानवर जनजागृती करण्याचे आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या वतीने केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web