कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने “श्री गणेश दर्शन ” स्पर्धा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत भाद्रपद महिन्यातील 5, 7 व 10 दिवसांच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकरीता “स्वच्छ सर्वेक्षण” “माझी वसुंधरा” अभियानाच्या माध्यमातून, गणेशमूर्ती (स्थानिक मुर्तीकार ) व सजावट या दोन निकषांवर श्री गणेशदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. सदर स्पर्धेसाठी प्रवेश अर्ज दि.22 ऑगस्ट दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 4.00 पर्यंत महापालिका मुख्यालयातील माहिती व जनसंपर्क विभाग, त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या 10 प्रभागक्षेत्र कार्यालयात उपलब्ध होतील.

स्पर्धेत सहभागी होणा-या मंडळांना महापालिकेचे परिक्षक मंडळ दि. 2 सप्टेंबर पासून पुढील 3 दिवसाच्या कालावधीत सायंकाळी / रात्री कधीही भेट देतील. परीक्षक मंडळांचा निर्णय हा अंतिम व बंधनकारक राहिल.

पुरस्कारासाठी निवड करताना श्री गणेश मूर्तींची सुबकता, उंची, मुर्ती बनविण्यासाठी उपयोगात आणलेले माध्यम (शाडू माती, इकोफ्रेन्डली ) तसेच देखाव्यासाठी निवडलेल्या विषयात स्त्रीभ्रुण हत्या, स्त्रीशिक्षण, पर्यावरणाचा समतोल, पाणी वाचवा, स्मार्ट सिटी, कचरा व्यवस्थापन (ई कचरा/ घनकचरा) निर्माल्याचे नियोजन उत्सवाच्या रुपाने निर्माण होणा-या इतर कच-याची नियोजन पध्दती, प्लास्टिक मुक्त पर्यावरण सजावट यावर भर दिला जाईल व मंडळाचे विधायक कार्य, स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहिमेला दिलेला प्रतिसाद इत्यादींचा प्रामुख्याने विचार केला जाईल.

श्री गणेशमूर्तींसाठी प्रथम पुरस्कार रु. 10,000/- व‍ स्मृतिचिन्ह , व्दितीय पुरस्कार रु.6,000/- व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार रु. 4,000/- व‍ स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार (दोन) असे प्रत्येकी रु. 2,000/-व स्मृतिचिन्ह तसेच सजावटीसाठी प्रथम पुरस्कार रु. 15000/- व‍ स्मृतिचिन्ह , व्दितीय पुरस्कार रु.12000/- व स्मृतिचिन्ह, तृतीय पुरस्कार रु. 10000/- व‍ स्मृतिचिन्ह तसेच उत्तेजनार्थ पुरस्कार (दोन) असे प्रत्येकी रु. 4000/-व स्मृतिचिन्ह कल्याण व डोंबिवली विभागांकरीता स्वतंत्र अशा रक्कमेची असतील.

तरी जास्तीत जास्त श्री गणेश उत्सव मंडळांनी यास्पर्धेत सहभागी होवून प्रतिसाद दयावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web