सामाजिक चळवळीचा आवाज हरवला, मा.आमदार विनायक मेटे यांचे अपघाती निधन

मुंबई – शिवसंग्राम संघटनेचे संस्थापक, माजी आमदार विनायक मेटे यांचे आज पाहाटे अपघाती निधन झाले. मुंबई पुणे एक्स्प्रेसवे वर हा भीषण अपघात झाला. त्यांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांना तिथे मृत घोषित केले. मराठा समाजाच्या विध्यार्थ्यांसाठी व आरक्षणासाठी आवाज उठविण्यात विनायक मेटे आघाडीचे नेते होते. त्यांच्या निधनाने मराठा आरक्षणासह, सामाजिक चळवळीचा बुलंद आवाज, धडाडीचे नेतृत्व हरपले आहे.मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी आज मुंबई येथे बैठक बोलावली होती. या बैठकीला येत आसताना वाटेत हा अपघात झाला.त्यांच्या निधनाने मराठा आरक्षण चळवळीचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे.अरबी समुद्रातील शिवस्मारक आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर ते तळमळीने भाग घ्यायचे. या स्मारकाच्या कामासाठी राजकीय इच्छाशक्ती निर्माण करून निधीची तरतूद करून घेण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता

विनायक मेटे बीड जिल्हातील केज तालुक्यातील राजे गावाचे रहिवाशी होते. सर्व पक्षाच्या बड्या नेत्यांशी विनायक मेटे यांचे चागले संबंध होते.मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात जीव गमवावा लागलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना शासकीय नोकरी मिळावी, त्यांचं योग्य पुनर्वसन व्हावं तसेच आंदोलन करताना दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, कामगार, गरीब लोकांना त्यांचे हक्क आणि न्याय मिळवून देण्यासाठी ते कायम लढत राहिले. मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचा एक बुलंद आवाज आज हरपला आहे. माजी आमदार विनायक मेटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web