देशातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाने केला २०६.८८कोटीचा टप्पा पार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने  206.88 कोटीहून (2,06,88,49,775) अधिक मात्रांचा टप्पा पार केला आहे आणि एकूण 2,74,59,679 सत्रांतून हे साध्य केले आहे.

12 ते14 वर्षे वयोगटातील किशोरांसाठी कोविड प्रतिबंधक 2लसीकरण 16 मार्च 2022 रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 3.95 कोटी (3,95,81,306) पौगंडावस्थेतील मुलांना कोविड-19  ची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना कोविड-19 ची खबरदारीची मात्रा  देण्यास 10 एप्रिल 2022 रोजी सुरूवात झाली.

आज सकाळी सात वाजता उपलब्ध झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, एकत्रित आकडेवारीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Cumulative Vaccine Dose Coverage
HCWs1st Dose10412739
2nd Dose10096247
Precaution Dose6482489
FLWs1st Dose18432175
2nd Dose17680866
Precaution Dose12596212
Age Group 12-14 years1st Dose39581306
2nd Dose28816863
Age Group 15-18 years1st Dose61385582
2nd Dose51564142
Age Group 18-44 years1st Dose559887543
2nd Dose510317252
Precaution Dose35105420
Age Group 45-59 years1st Dose203761918
2nd Dose195654217
Precaution Dose22077781
Over 60 years1st Dose127490906
2nd Dose122278479
Precaution Dose35227638
Precaution Dose11,14,89,540
Total2,06,88,49,775

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या1,31,807 इतकी आहे. देशातील पाॅझिटीव्ह रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रूग्णांची टक्केवारी 0.31 टक्के इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण  कोविडमुक्त होण्याचा दर 98.51 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत,16,412 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या (कोविड महामारीच्या  आरंभापासून) आता 4,35,16,071 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 12,751 नवीन कोविड रूग्णांची नोंद झाली आहे.

गेल्या 24 तासांत, 3,63,855 कोविड चाचण्या घेण्यात आल्या. भारताने आतापर्यंत 87.85 कोटी (87,85,52,017) एकूण चाचण्या घेतल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 4.69 टक्के इतका आहे. तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 3.50 टक्के इतका नोंदवला गेला आहे

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web