५० लाखाची खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण, चार खंडणीखोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नेशन न्यूज मराठी टीम.

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील एका प्लायवुड विक्रेत्याच्या दुकानात ग्राहक बनून तीन लाखाचे प्लायवुडची ऑर्डर देत पैसे एटीएम मधून काढून देत असल्याचे सांगत एका गाडीमध्ये व्यापाऱ्याला बसवून अपहरण केले. त्यानंतर जीवे ठार मारण्याची धमकी देत 50 लाखाची खंडणी मागितली होती. मानपाडा पोलिसांनी खंडणी मागणाऱ्या 4 खडणीखोरांना मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. संजय रामकिशन विश्वकर्मा, संदिप ज्ञानदेव रोकडे ,धर्मदाज अंबादास कांबळे व रोशन गणपत सांवत असे अटक करण्यात आलेल्या खंडणीखोरांची नावे आहेत.

आठ तासाच्या आत पैसे देण्याच्या बहाण्याने पोलिसांनी सापळा रचत मुंबई – आगरा रोडवरील गोठेघर परिसरातून त्यांना अटक केली. त्यांच्या कडून ५.३२,०००/- रू.ची झायलो कार व ४ मोबाईल पोलिसाने जप्त केले आहे . या आरोपीमध्ये एक आरोपी दुकान मालकाच्या ओळखीचा असल्याने दुकानात जाऊन पैसे देण्याच्या बहाण्याने त्याला बाहेर घेऊन जाऊन आपल्या साथीदाराच्या सोबत मिळून त्यांनी व्यापाऱ्याचे अपहरण केले होते आशी माहिती डोंबिवलीचे एसीपी सुनिल कुराडे यांनी दिली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web