नेशन न्यूज मराठी टीम.
डोंबिवली – वाढती महागाई आणि बेरोजगारी देशासाठी चिंतेचा विषय बनला आहे.केंद्र सरकार यावर योग्य पाउले उचलत नसल्याने तरुण वर्गात सरकारविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.नागरिकांना सरकारबाबत चीड आली आहे. असे कॉग्रेसचे म्हणणे आहे. यामुळे केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत कॉंग्रेसने डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात आंदोलन केले.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे, महाराष्ट्र प्रदेश रोजगार विभाग प्रदेश अध्यक्ष नवीन सिंग, काँग्रेस कमिटी डोंबिवली शहर अध्यक्ष अजय पौळकर, महिला काँग्रेस जिल्हा सचिव वर्षा गुजर-जगताप, जिल्हाध्यक्ष श्याम यादव, ज्येष्ठ नेते पॉली जॅकब,जिल्हा उपाध्यक्ष सुरेखा ठाकूर, युवक काँग्रेस डोंबिवली अध्यक्ष पमेश म्हात्रे, मानव अधिकार विभाग जिल्हा अध्यक्ष राजकुमार हिरावत, डोंबिवली पश्चिम ब्लॉक अध्यक्ष गणेश चौधरी, आरोग्य विभाग जिल्हा अध्यक्ष जितेंद्र मुळे,प्रणव केणे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश रोजगार विभाग प्रदेश अध्यक्ष सिंग यांनी देशातील बेरोजगारीवर बोलताना मोदि सरकारने नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते ते सत्यात उतरले जात नसल्याचे सांगितले. तर काँग्रेस कमिटी डोंबिवली शहर अध्यक्ष पौळकर म्हणाले, महाराष्ट्र अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी 75000 पीक कर्ज माफ करा, पेट्रोल, डिझेल,घरगुती गँस भाववाढ रद्द करा, जिवनावश्यक वस्तुवरील जीएसटी रद्द करा, शालेय शिक्षण वरील जीएसटी कर रद्द करा, आरोग्य सेवेवरील जीएसटी कर रद्द करा, अग्निपथ भरती योजना रद्द करा. केंद्रात आणि राज्यात भरती प्रक्रिया सुरू करा अशा विविध मागण्या केल्या.
महाराष्ट्र प्रदेश सचिव संतोष केणे यांनी भाजपावर टीका हे सरकार महाराष्ट्राचे तीन तुकडे करतील असे सांगितले. जिल्हाध्यक्ष श्याम यादव म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज ,महात्मा फुले या थोरमहापुरुषांचा अपमान केला आहे. हे जनता कधीही विसणार नाही.