नेशन न्यूज मराठी नेटवर्क.
तामिळनाडू – तामिळनाडू मधील ममल्लापुरम येथे सुरु असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये बुधवारी महिला गटातील सहाव्या फेरीच्या लढतीत भारताच्या कोनेरू हम्पीने महिलांमधील अव्वल बुद्धिबळपटूंपैकी एक असलेल्या नाना डझाग्निझे विरुद्ध शानदार विजय मिळवल्यामुळे भारत अ संघाने तिसऱ्या मानांकित जॉर्जियाचा 3-1 असा पराभव केला.
हंपी व्यतिरिक्त, आर वैशालीने लेला जावखिसविली या अव्वल मानांकित बुद्धिबळपटूलाही धक्का दिला. तर तानिया सचदेव आणि हरिका द्रोणवल्ली यांनी सामन्यात बरोबरी साधत भारताला सामना जिंकून देण्यात मदत केली.
मी स्पर्धेच्या या टप्प्यावर पदकांचा विचार करत नाही कारण आम्हाला अजूनही युक्रेनसारख्या अनेक बळकट संघांसोबत खेळायचे आहे.आमच्याकडे संघभावना मोठ्या प्रमाणात आहे आणि जेव्हा जेव्हा विजयाची गरज असते तेव्हा संघातील कोणताही एक खेळाडू चमकदार कामगिरी करतो.” , असे हंपी म्हणाली.”मी अडीच वर्षांनंतर खेळत आहे आणि सुरुवातीचा काही काळ मला खूप संघर्ष करावा लागला.आजही माझा खेळ नेहमीप्रमाणे लांबला”, असे तिने सांगितले.

भारत आणि जॉर्जिया यांच्या सामन्यासोबत एकाचवेळी झालेल्या दुसऱ्या सामन्यात रुमानिया आणि युक्रेनने 2-2 अशी बरोबरी साधली.अझरबैजानने कझाकिस्तानचा 3-1असा पराभव केला तर पोलंडने सर्बियाचा 4-0. असा पराभव केला.
दरम्यान, डी गुकेशने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत सलग सहावा विजय मिळवला पण खुल्या विभागात भारत ब संघ अर्मेनियाकडून 1.5-2.5 ने पराभूत झाल्यामुळे त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले.
निहाल सरीनने दुसऱ्या फेरीत बरोबरी साधली तर अधिबान बी आणि रौनक साधवानी यांचा पराभव झाला.
दुसरीकडे भारत क संघाने लिथुआनियावर 3.5-1.5 असा विजय मिळवला तर द्वितीय मानांकित भारत अ संघाने उझबेकिस्तानला 2-2 असे बरोबरीत रोखले.