रेल्वेकडून जुलै मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक मासिक १२२.१४ मेट्रिक टन मालवाहतुकीची नोंद

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेने जुलै 2022 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक म्हणजे 122. 14 मेट्रिक टन मालवाहतूक केल्याची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 च्या जुलै महिन्यात साध्य केलेल्या सर्वोत्कृष्ट मालवाहतुकीच्या आकड्यापेक्षा ही वाढ 9.30 मेट्रिक टन अधिक असून टक्केवारीत ही वाढ 8.25 टक्के इतकी आहे. यासह, भारतीय रेल्वेने मासिक मालवाहतुकीत आतापर्यंतची सर्वाधिक वाढीव नोंद केली असून कोळशाची वाहतूक 11.54 मेट्रिक टन झाली आहे तर त्याखालोखाल इतर शिलकी मालाच्याबाबतीत 1.22 मेट्रिक टन, सिमेंट आणि जळालेला कोळशाची तसेच कंटेनर्सच्या बाबतीत प्रत्येकी 0.56 मेट्रिक टन, पीओएलची वाहतूक 0.47 मेट्रिक टन इतकी नोंदवली गेली  आहे.

वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये स्‍वयंचलित  वाहनांच्या मालवाहतुकीत  झालेली वाढ हे आणखी एक मालवाहतूक व्यवसाय वाढण्‍याचे कारण आहे. वित्तीय वर्ष 2022-23 मध्ये जुलैपर्यंत 1698 वाघिणींव्दारे  वाहतूक करण्यात आली असून गेल्या वर्षी याच कालावधीत 994 वाघिणींच्याव्दारे वाहतूक करण्यात आली होती. याचा अर्थ ही वाढ 71 टक्के आहे.

1 एप्रिल  2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत एकूण मालवाहतूक 501.53 मेट्रिक टन इतकी झाली असून 2021-22 मध्ये याच काळामध्ये  452.13  मेट्रिक टन मालवाहतूक करण्यात आली होती. याचा अर्थ ही वाढीव मालवाहतूक 49.40 मेट्रिक टन इतकी आहे आणि मागील वर्षीच्या  याच कालावधीपेक्षा मालवाहतुकीमध्‍ये 10.92 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे.

मालवाहतुकीचे निव्वळ टन किलोमीटरची (एनटीकेएम) वाहतूक जुलै 21 मध्ये असलेल्या 63.3 अब्जापासून 18.38 टक्के वाढीसह ती 75 अब्ज इतकी जुलै 2022 मध्ये झाली आहे. पहिल्या चार महिन्यांमध्‍ये  एकूण एनटीकेएममध्येही 19.46 टक्के वाढ झाली आहे.

जुलै महिन्यात मालवाहतूक क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भारतीय रेल्वेने उर्जा आणि कोळसा मंत्रालयाशी निकटच्या सहकार्याने कोळशाची वाहतूक वीज निर्मिती केंद्रांपर्यंत करण्यासाठी केलेले शाश्वत प्रयत्न हे राहिले आहे.

CommodityVariation(MT)% variation
Coal11.5423.45
Cement and Clinker0.565.10
POL0.4712.90
Containers0.569.30
Balance Other Goods1.2213.25
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web