राज्य उत्पादन शुल्काची बनावट मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड,५१ लाख ६३ हजाराचा मुद्येमाल जप्त

नेशन न्यूज मराठी टीम.

लातूर – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त मा. कांतीलाल उमाप साहेब, संचालक सुनिल चव्हाण साहेब यांनी दिलेल्या निदेशानुसार व मा. विभागीय उप आयुक्त प्रदिप एच. पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्हयातील अधीक्षक अभिजित देशमुख यांनी भरारी पथक, उस्मानाबाद / लातूर यांच्या स्टाफ व लातूर स्टाफ समवेत यांनी कृष्णार्जुन अँग्रो इंडस्ट्रिज अँड वेअर हाऊस, भुसणी शिवार हासेगांव रोड, भुसणी, ता. औसा, जि. लातूर या ठिकाणी दिनांक २६/७/२०२२ रोजी धाड टाकली असता त्या ठिकाणी अवैधरित्या विनापरवाना बनावट देशी मद्याच निर्मिती व त्यासाठी लागणारे स्पिरीट (मद्यसार) चा साठा आढळून आला.

या ठिकाणी गुन्हयामध्ये (१) २०० ली. क्षमतेचे ३९ प्लॅस्टीक बॅरल ज्यात ७८०० ली. स्पिरीट (२) फेलवर (इसेंस) (३) २० बॉक्स टोपण (बुचे) (४) एकबॉटलींग (सिलींग व पॅकींग) मशीन (५) पाणी फिल्टर मशीन (६) ब्लैंड मिक्सींग मशीन (७) विविध बँडचे लेबल (८) अल्कोहोल मिटर (९) मेजरींग टयुब (१०) १८० मिली काचेच्या बाटल्या (११) ९० मिली प्लॅस्टीक बाटल्या (१२) पाणी मोटर (१३) रिकामे कार्टून बॉक्स (१४) २०० ली. क्षमतेचे सिंटेक्स टाक्या (१५) ५०० ली क्षमतेचे सिंटेक्स टाक्या (१६) पॅकींग स्लीप (१७) दोन मोबाईल (१८) इरटिका चारचाकी वाहन क्र. MH-१२ HZ-६१०२ (१९) एक अशोक लेलँड चारचाकी कंटेनर क्र. MH-४-EM ८४५० (२०) एक टाटा चारचाकी ट्रक क्र. MH-४०-BL ८४०७ असा एकूण ५१, ६३, ५५०/- रुपये इतका अवैध मुद्देमाल जप्त करण्यात उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. या ठिकाणी रविकुमार शिवपुजन गुप्ता, वय २७ वर्षे, आणि ज्ञानेश्वर बाबुसिंग राजपुत वय ४५ वर्षे यांना अटक करण्यात आली.

सदर कारवाई मध्ये अधीक्षक अभिजित देशमुख, भरारी पथक निरीक्षक टी. एस. कदम, दुय्यम निरीक्षक पी. जी. कदम, सचिन शेटे, आर. ए. घोरपडे, जवान महेश कंकाळ, विशाल चव्हाण, राजेश गिरी, एजाज शेख तसेच लातूर निरीक्षक आर. एम. बांगर, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमोल शिंदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणेश गोले, अनिरुद्ध देशपांडे, हनुमंत मुंडे, संतोष केंद्रे, सुरेश काळे या पथकाने केली आहे. पुढील तपास भरारी पथक, उस्मानाबाद/लातूर निरीक्षक- टी.एस. कदम हे करित आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web