नेशन न्यूज मराठी टीम.
लातूर/प्रतिनिधी – मानवाने आपल्या प्रगतीसाठी दिसेल त्या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आणले व त्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळून निसर्गाचा कोप आपल्याला बघायला मिळाला आहे. या कोपापासून आपल्याला जर वाचायचे असेल तर वृक्ष लागवड करणे महत्वाचे आहे आसाच एक उपक्रम लातूर जिल्हात बघायला मिळाला.
लातूर जिल्हा दुष्काळमुक्त करून वनक्षेत्रात वाढ करण्यासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या नेतृत्वाखाली दहा किलोमीटरची मानवी साखळी करत 14 गावात 28 हजार वृक्षांची लागवड अकरा वाजून अकरा मिनिटांनी करण्यात आली
शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, NGO ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन लातूर मधील मांजरा नदीच्या तीरावर 14 गावात 28 हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. मागील काळात लातूर शहराला मिरजहून रेल्वेने पाणी आणावं लागलं तर दुसरीकडे जिल्ह्याचे वनक्षेत्र केवळ सहा टक्के आहे त्यात वाढ करण्यासाठी ही मोहीम हाती घेतली गेली आहे. भविष्यात वनक्षेत्रात वाढ झाली तर पर्यावरणाचं संतुलन राखले जाईल अशी आशा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले आजच्या वृक्ष लागवड अभियान हे राज्यातील नव्हे तर देशांनी आदर्श घेण्यासारखे मोहीम असल्याचे मत शेतकरी नेते पाशा पटेल यांनी स्पष्ट केले आहे.