शिवसेना कल्याण शहर प्रमुखपदी सचिन बासरे

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने कल्याण शहर अध्यक्षपदी माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेता सचिन बासरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून दिलेल्या पत्रकाद्वारे हि माहिती कळविण्यात आली आहे. यावेळी नेते जरी शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच असल्याचे सचिन बासरे यांनी सांगितले.

आमदार विश्वनाथ भोईर हे शिंदे गटात सामील झाल्याने त्यांच्या शहर प्रमुख पदाबाबत कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होत होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून विश्वनाथ भोईर यांच्या जागी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आणि तीन वेळा नगरसेवक असलेल्या सचिन बासरे यांची निवड करण्यात आल्याचे शिवेनेच्या अधिकृत सामना या मुखपत्रातून जाहीर केले आहे. त्यांच्या या निवडीनंतर त्यांनी शिवसेनेच्या कल्याण शहर शाखेत पदभार स्वीकारला. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिक भेटीला येत होते. यावेळी जेष्ठ शिवसैनिक रवी कपोते, शिवसेना सह संपर्क प्रमुख शरद पाटील, हेमंत चौधरी, वंडार कारभारी,  गणपत घुगे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सामान्य शिवसैनिक म्हणून आपली शहर प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली आहे. याचा आनंद असून हि एक मोठी जवाबदारी आहे. हि जवाबदारी सर्व जेष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी आणि शिवसैनिक यांना बरोबर घेऊन पार पाडणार आहे. कल्याणकर जनतेने जे प्रेम शिवसेनेला दिलं आहे ती जनता आमच्या पाठीशी असून आगामी काळात पुन्हा केडीएमसीवर भगवा फडकवू. नेते जरी आज शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसैनिक शिवसेनेसोबत आहे. कोण गेलं याचा विचार करणार नाही कोण आहेत आणि कोण आमच्यासोबत येणार त्यांना सोबत घेवून संघटनेच काम करेन असे यावेळी सचिन बासरे यांनी सांगितले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web