वीजदरवाढी विरोधात कल्याण डोंबिवलीत आम आदमी पार्टीचे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – महाराष्ट्रात वाढलेल्या वीज दराच्या विरोधात आज आम आदमी पार्टी तर्फे तालुका, शहर व जिल्हा पातळीवर राज्यव्यापी शांतीपूर्ण निषेध आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानुसार कल्याण  डोंबिवलीमध्ये  महावितरण कार्यालये आणि तहसीलदार कार्यलयाबाहेर आंदोलन करण्यात आले.

 महागाईमुळे होरपळलेल्या जनतेला महाराष्ट्रात सत्तेवर आलेल्या नवनियुक्त सरकारने विजेच्या दरांत भरमसाठ वाढ करून जनतेला मोठा आर्थिक झटका दिला आहे.  अडीच वर्षे विजेचे दर कमी करा म्हणून आंदोलन करणारे सरकारमध्ये येताच दरवाढ करतात. जुमलेबाज सरकार जे बोलते अगदी त्याच्या विरुद्ध करते. संपूर्ण देशात सर्वात महागडी वीज आपल्या महाराष्ट्रात आहे. अडीच रुपयात निर्माण होणारी वीज पंधरा  रुपयात विकणारे सावकारी प्रवृत्तीचे लोक आज सरकारात बसलेले आहेत. यांना सर्वसामान्य लोकांची काहीच काळजी नसल्याचा आरोप  आम आदमी पार्टीने केला आहे.

दिल्लीत आम आदमी पक्षाचे सरकार असून तेथे २०० युनिट पर्यंत वीज मोफत दिली जाते. तसेच ४०० युनिट पर्यंत ५० टक्के दर आकारला जातो. पंजाब मधे १ जुलै पासून ३०० युनिट वीज मोफत करण्यात आलेली आहे. आम आदमी पक्षाचे इमानदार सरकार जे बोलते ते करते. संपूर्ण देशात सर्वात स्वस्त वीज दिल्लीत ७२ टक्के लोकांना o रुपयांचे बिल देते. यामुळे येथील वीज आकार बंद करा २०० युनिट वीज मोफत द्या. नफाखोरी बंद करा. सावकारी बंद करा आदी मागण्यांसाठी आपच्या वतीने कल्याण मधील महावितरणच्या तेजश्री कार्यालय व तहसिलदार कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.त्याचप्रमाणे डोंबिवली पूर्वेतील स्टेशन जवळील महावितरण बिलिंग ऑफिस याठिकाणी देखील आपच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web