शिवसेनाला पुन्हा धक्का, कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांचाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण– ठाण्यातील नगरसेवकांनी एकमताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिल्यानंतर आता कल्याण डोंबिवलीतील नगरसेवकांनीही काल रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपला पाठींबा जाहीर केला. यामध्ये सुमारे ४० नगरसेवक आणि शिवसेनेचे काही वरिष्ठ पदाधिकारीही असल्याची माहिती आहे.

ठाणे महानगपालिकेच्या ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन देऊन काही तासही उलटले नसताना शिवसेनाचा बालेकिल्ला असणाऱ्या कल्याण डोंबिवलीतील तब्बल ४० नगरसेवक पदाधिकार्यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. तसेच काही नगरसेवक हे बाहेरगावी आहेत तर काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे यावेळी उपस्थित राहू शकले नसले तरी अशा सर्व नगरसेवकांनीही आम्ही सर्वजण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत असल्याचेच सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील नंदनवन या शासकीय निवासस्थानी या सर्व नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही भेट घेतली.
दरम्यान यावेळी उपस्थित नगरसेवक पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून हा विकास रथ प्रगतीपथावर नेण्याचे स्वप्न आपण पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web