जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी उद्या भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली – जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, उद्या देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web