भारतीय नौदलाच्या आयएनएस सातपुडा, पी8आय विमानांचा रिंपॅक सरावात हार्बर टप्प्यात सहभाग

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली – भारतीय नौदलाची  स्वदेशी युद्धनौका  आयएनएस  सातपुडा आणि पी8आय एलआरएमआरएएसडब्ल्यू   विमाने हवाई मधील पर्ल हार्बर येथे आयोजित सर्वात मोठ्या बहुपक्षीय नौदल सरावांमध्ये भाग घेत आहेत, या सरावाला रिम ऑफ द पॅसिफिक सराव म्हणजेच रिंपॅक देखील म्हणतात.सातपुडा युद्धनौका  27 जून 22 रोजी हवाईला पोहोचली तर पी8आय विमाने  02 जुलै 22 रोजी दाखल झाली. या सरावाच्या  हार्बर टप्प्यात अनेक परिसंवाद, सराव  नियोजन चर्चा आणि क्रीडा स्पर्धांचा समावेश होता. भारताच्या चमूने  ऐतिहासिक संग्रहालय जहाज युएसएस मिसौरीला देखील भेट दिली आणि युएसएस  ऍरिझोना स्मृतीस्थळ येथे दुसऱ्या महायुद्धात सर्वोच्च बलिदान दिलेल्या शहीद सैनिकांना श्रद्धांजली वाहिली.

आयएनएस सातपुडा आणि एक पी8आय  सागरी गस्ती विमाने  या सरावात सहभागी होत आहेत. तीव्र मोहिमा आणि प्रशिक्षणाचा समावेश असलेला हा सराव   सहा आठवड्यांपेक्षा जास्त काळ चालणार असून आंतर कार्यक्षमता वाढवणे आणि मैत्री असलेल्या परदेशी देशांच्या नौदलांमध्ये विश्वास निर्माण करणे हा या सर्वाचा उद्देश आहे.28 देश, 38 युद्धनौका, 09 भूदल, 31 मानवरहित यंत्रणा, 170 विमाने आणि 25,000 हून अधिक जवान या बहुआयामी सरावात सहभागी होत आहेत.समुद्र टप्पा 12 जुलै 22 रोजी सुरू होईल आणि 04 ऑगस्ट 22 रोजी समारोप समारंभाने या टप्याचा समारोप होईल.

भारतीय नौदलाचे पी8आय एलआरएमआरएएसडब्ल्यू विमान जगातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय सागरी सराव द्विवार्षिक रिम ऑफ पॅसिफिक (रिंपॅक-22) च्या 28 व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी एएफबी हिकम, जॉइंट बेस पर्ल हार्बर, हवाई, अमेरिका येथे पोहोचले. कमांडर  पुनीत दाबस यांच्या नेतृत्वाखालील पी8आय  तुकडीचे   हिकम विमानतळावर  एमपीआरए  ऑपरेशन्सचे प्रमुख विंग कमांडर मॅट स्टकलेस (आरएएएफ ) यांनी स्वागत केले.पी8आय  विमाने सात सहभागी राष्ट्रांमधील 20 एमपीआरए सह समन्वित बहुराष्ट्रीय, बहु-मंचीय अत्याधुनिक पाणबुडीविरोधी युद्ध  मोहिमांमध्ये सहभागी होणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web