कल्याण डोंबिवलीत मुसळधार, गेल्या २४ तासांत ११४ मिलीमीटर पावसाची नोंद

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – संपूर्ण जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात मात्र पावसाने आपला बॅकलॉग भरण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. कालपासूनच पावसाने कल्याण डोंबिवलीला अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या २४ तासांत कल्याण डोंबिवलीमध्ये ११४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

संपूर्ण जून महिना पावसाऐवजी घामाच्या धारा पुसण्यातच गेल्याने सर्वच जण चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. नाही म्हणायला जून महिन्यात थोडे फार पावसाचे शिंतोडे पडले. परंतु त्याने वातावरणातील गर्मी कमी होण्याऐवजी त्यात आणखीनच भर पडली. परिणामी जुलै महिन्यात तरी पाऊस पडतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष होते. तर कालपासूनच कल्याण डोंबिवलीसह आसपासच्या परिसरात पावसाने चांगलीच बॅटिंग सुरू केली आहे. गेल्या वर्षीच्या पावसाची आकडेवारी पाहता हा पाऊस कमी असला तरी येत्या काळात ही तूट भरून निघेल अशी आशा नागरिक करत आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाची आकडेवारी

ठाणे – १३३ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४९६ मिलीमीटर)

कल्याण डोंबिवली – ११४ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३८३ मिलीमीटर)

मुरबाड – ३९ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस २९१ मिलीमीटर)

भिवंडी – ११५ मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३९१ मिलीमीटर)

शहापूर – ६० मिलीमीटर ,
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ३७२ मिलीमीटर)

उल्हासनगर – ९६ मिलीमीटर
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४१२ मिलीमीटर)

अंबरनाथ – ९२ मिलीमीटर
(१ जून ते ५ जुलैपर्यंत झालेला पाऊस ४३८ मिलीमीटर)

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web