नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – ठाणे जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या वतीने ठाणे जिल्हा स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धा व राज्य निवड चाचणी रविवारी कल्याण येथील मोहनस् मार्शल आर्ट्स आणि फिटनेस प्लॅनेट येथे पार पडली. या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविणाऱ्या खेळाडूंची निवड १६ जुलै रोजी, अहमदनगर येथे होणाऱ्या राज्य स्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत असलेल्या खेळाडू गौरी तिटमे, हर्षदा पाडेकर आणि आकांक्षा जाधव यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या तिन्ही खेळाडूंनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या तिन्ही खेळाडूंची अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या तिन्ही खेळाडूंना स्पर्धेदरम्यान संघ व्यवस्थापक संतोष मुंढे यांचे मार्गदर्शन लाभले.