नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याचे दिसून येत आहे .पालिकेतील अनेक प्रभागातील मतदारांची नावे बाजूच्या प्रभागातील मतदार याद्यां मध्ये समाविष्ट केल्याने पालिकेच्या निवडणूक विभागाच्या अनागोदी कारभारा बाबत नागरिकांसह इच्युक उमेदवारा मध्ये संतापाची लाट पसरली आहे.प्रारूप मतदार यादी बाबत हरकती दाखल करण्यासाठी पालिकेच्या निवडणूक विभागाने दिलेल्या कालावधीत तब्बल पालिकेच्या दहा प्रभागातून ५७३८ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत .प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादी बाबत सर्वाधिक हरकती बाजूच्या प्रभागातील मतदार यादीत मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आल्या बाबत असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या आगामी पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग कडून निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.पालिकेत प्रथमच त्रिसदस्यीय पेनेल पद्धतीने होणार असल्याने मागील पालिका निवडणुकीतील तीन प्रभागाचा एक प्रभाग तयार करण्यात आला आहे .पालिकेतील १३३ सदस्य निवडी साठी त्रिसदस्य ४३ प्रभाग तर चार सदस्यांचा एक प्रभाग अश्या ४४ प्रभागाच्या निवडणुकी साठी अतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्या नंतर ४४ प्रभागाच्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादया २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्रिसदस्यीय प्रभाग मध्ये प्रभाग क्र.१७ हा सर्वात जास्त ३८ हजार ३८५ लोकसंख्या असलेला प्रभाग तर प्रभाग क्र.३ हा सर्वात कमी २९ हजार २४ लोकसंख्या असलेला प्रभाग क्र.३ आहे तर चार सदस्य असलेल्या एका प्रभातील लोकसंख्या ५१ हजार ९३५ असून सर्वाधिक मोठया लोकसंख्या असलेला प्रभाग क्र.४४ हा आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार प्रसिद्ध केलेल्या प्रभाग निहाय मतदार यादी बाबत हरकती सादर करण्यासाठी दिलेल्या कालावधीत ३ जुलै शेवटची तारीख होती .मतदार याद्या बाबत हरकती घेण्याच्या कालावधी पालिकेच्या निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याचे नागरिकांसह, इच्युक उमेदवार व माजी नगरसेवक सेवकांच्या निदर्शनास आले आहे.अनेक मतदार राहायला एका प्रभागात आणि त्यांची नावे मतदार यादीत दुसऱ्या प्रभागात समाविष्ट झाल्याने पालिकेच्या निवडणूक विभागाच्या अनागोंदी कारभारा बाबत संताप व्यक्त केला जात आहे.राजकीय दबावा खाली पालिका प्रशासनाच्या निवडणूक विभागाने मतदार यादीत अदला बदल करून मतदारांची नावे जाणीव पूर्वक दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत जोडली गेल्याचा केल्याचा आरोप माजी नगरसेवक व इच्युक उमेदवारा मधून केला जात आहे.
प्रारूप मतदार यादी बाबत लेखी स्वरूपात हरकती दाखल करण्यासाठी पालिका प्रशासनाने पालिका मुख्यालयातील निवडणूक विभागाच्या कार्यालया सह पालिकेच्या दहा प्रभाग क्षेत्र कार्यालयात सुविधा उपलब्ध करून दिली होती.पालिकेच्या दहा प्रभागातून दाखल झालेल्या हरकती व सूचना मध्ये डोंबिवली पूर्वेतील ८- ग प्रभागातून सर्वाधिक ३१०४ हरकती व सूचना दाखल झाल्या तर दुसरीकडे सर्वाधिक कमी २२ हरकती व सूचना डोंबिवली पूर्वेतील ६ – फ प्रभागातून दाखल झाल्या आहेत.पालिकेच्या ४४ प्रभागाच्या निवडणुकीत टिटवाळा तील प्रभाग क्र.६ मांडा पूर्व – पश्चिम,गणेश मंदिर मध्ये सर्वाधिक जास्त ३६ हजार ६७८ मतदार संख्या असलेला प्रभाग आहे तर डोंबिवली पश्चिमे कडील प्रभाग.क्र.२९मोठा गावं ठाकुर्ली,आनंद नगर, नवागावं या प्रभागात सर्वा कमी १६ हजार ८०५ इतके मतदार आहेत.
सादर करण्यात आलेल्या सर्वधिक हरकती व सूचना या एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत समाविष्ट केल्याच्या तक्रारी असल्याची माहिती पालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.सादर झालेल्या हरकती व सूचनांचे निराकरण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सात प्राधिकृत अधिकारी यांची नेमणूक केली असून त्याच्या मार्गदर्शनाखाली हरकती व सूचनांचा निपटारा केला जाईल व ९ जुलै २०२२ रोजी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी जाहीर करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त सुधाकर जगताप यांनी दिली.