मूसळधार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील टेकडीची दरड कोसळली

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण– दोन दिवसा पासून पडणार्‍या मुसळधार पावसाने आपला  जोर  कायम ठेवला आहे. सकाळ  पासून पडणार्‍या जोरदार मूसळधार पावसामुळे कल्याण पूर्व भागातील टेकडीच्या पायथ्यापाशी  असलेल्या बैठ्या घरांच्या जवळ पास दरडीचे कोसळलेले मोठे दगड कोसळून पडले मात्र सुदैवाने घटनेत घरांचे नुकसान व जीवित हानी टळली. महापालिकेच्या प्रभाग अधिकार्‍यांनी व आपतकालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली बचाव कार्याला सुरुवात करीत टेकडीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी  हलविण्यात  आले. 

कल्याण पूर्वेतील टेकडी वजा छोटा डोंगराचा भाग आहे. सोमवारी दुपार पासून मुसळधार पावसाने अधिकच जोर धरल्याने सायंकाळच्या सुमारास या छोट्या डोंगराच्या टेकडीच्या दरडीचा काही भाग कोसळला.व कोसळलेल्या दरडी बरोबर मोठे दगड खाली आले. या टेकडीच्या  पायथ्यापाशी बैठी घरे असुन  सुदैवाने या घरांवर दरड कोसळली नाही  व या बैठ्या घरातील  एकाही व्यक्तीला इजा झालेली नाही. या घटनेची माहीती मिळताच घटना स्थळी प्रभाग अधिकारी हेमा मुंबरकर यांनी धाव घेतली. घटना घडलेल्या परिसरातील पाच कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या कुटुंबियांना राधा कृष्ण मंदिराच्या हॉलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांच्या जेवण पाण्याची व्यवस्था महापालिकेकडून उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती प्रभाग अधिकारी मुंबरकर यांनी दिली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web