शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नेशन न्यूज मराठी टीम.

सातारा – शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर आज खटाव  येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व भारतीय सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानास मानवंदना दिली.यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील व विविध विभागाचे अधिकारी यांनी शहीद जवान सुरज शेळके यांना पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.शहीद सुरज शेळके यांचे वडील प्रताप व बंधू गणेश यांनी पार्थिवाला मुखअग्नी देऊन अंत्यसंस्कार केले. यावेळी लष्कराचे आजी, माजी अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web