पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने विकसित केले “सूर्या नूतन” स्वदेशी सोलर कुक टॉप

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – पंतप्रधानांनी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना 25 सप्टेंबर 2017 रोजी संबोधित करताना आपल्या स्वयंपाकघरांना अधिक बळ देण्यासाठी एक व्यवहार्य सौर उपाय विकसित करण्याचे आव्हान दिले होते. त्या अनुषंगाने इंडियन ऑइल व  पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने “सूर्या नूतन” हे स्वदेशी सोलर कुक टॉप विकसित केले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री  हरदीप पुरी यांच्या निवासस्थानी  केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह, वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री, सोम प्रकाश; गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांच्या उपस्थितीत सूर्या नूतनचे प्रात्यक्षिक करण्यात आले; .

ठळक वैशिष्ट्ये:

  • सूर्या नूतन एक स्थिर, रिचार्ज करण्यायोग्य आणि कायम स्वयंपाकघराशी जोडलेले इनडोअर सोलर कुकिंग प्रणाली आहे.
  • इंडियन ऑइल संशोधन आणि विकास केंद्र , फरीदाबाद यांनी डिझाइन आणि विकसित केलेले हे पेटंट उत्पादन आहे.
  • सूर्याद्वारे चार्जिंग सुरु असताना ऑनलाइन कुकिंग मोडवर असते, ज्यामुळे  कार्यक्षमता वाढते आणि सूर्यापासून मिळणाऱ्या उर्जेचा अधिकतम वापर होतो.
  • हे हायब्रीड मोडवर काम करते (म्हणजेच सौर आणि सहाय्यक उर्जा स्त्रोत दोन्हीवर एकाच वेळी काम  करू शकते) ज्यामुळे  सर्व प्रकारच्या हवामानात स्वयंपाकासाठी सूर्या नूतन  एक विश्वासार्ह प्रणाली आहे.
  • सुरुवातीला, बेस मॉडेल उत्पादनाची किंमत सुमारे 12,000 रुपये आहे आणि अव्वल मॉडेलसाठी 23,000 रुपये आहे. मात्र उत्पादन वाढल्यावर किंमत कमी होणे  अपेक्षित आहे. अव्वल मॉडेलसाठी 12,000-14,000/-किमतीत ,वर्षाला 6-8 एलपीजी सिलिंडरचा  वापर गृहीत धरला तर हे उत्पादन पहिल्या 1-2 वर्षांतच ग्राहकाचे पैसे वसूल करून देते.
  • कोणत्याही इनडोअर उपकरणात आवश्यक असलेल्या सर्व सुरक्षा बाबी सूर्या नूतनमध्ये अंतर्भूत आहेत.
  • सूर्या नूतन ही कमी देखभालीची प्रणाली आहे आणि हे उत्पादन दीर्घकाळ टिकते.

सूर्या नूतनमध्ये आपली ऊर्जा सुरक्षा स्थिती बदलण्याची क्षमता आहे, कारण भारत सध्या त्याच्या एलपीजी गरजांच्या  50% आयात करतो. यामुळे भारतातील कार्बन उत्सर्जनही लक्षणीयरीत्या  कमी होईल आणि आपल्या नागरिकांना महागड्या आंतरराष्ट्रीय जीवाश्म इंधनाच्या किमतींपासून संरक्षण देईल.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web