टिटवाळ्यात पाणी टंचाई विरोधात भाजपाचा हंडा मोर्चा

नेशन न्यूज मराठी टीम.

टिटवाळा– अनेक दिवसांपासून मांडा टिटवाळा परिसरातील नागरीकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या विरोधात भाजपाने आज आक्रमक पवित्रा घेत भाजप मांडा टिटवाळा कडून महापालिका प्रशासना विरोधात मधुबन सोसायटी येथील नागरी सुविधा केंद्रावर हांडा मोर्चा काढून महापालिकेचा निषेध व्यक्त केला .अधिकारी यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले.
यावेळी मध्ये मांडा पश्चिम साठी रेल्वे खालुन पाणयाची मोठी लाईन टाकून लवकरात लवकर देणे, वासुद्री रोड पाणयाची मोठी लाईन, मांडा पश्चिम स्मशान भूमी पाणयाची लाईन, टिटवाळा येथील काळू नदीवरील बंधारा उंची वाढवणे आदि मागण्यांचे निवेदन पाणी पुरवठा अभियंता सुर्यवंशी यांना देण्यात आले.

यावेळी शिष्टमंडळात माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, बुधाराम सरनोबत, भाजपचे मोहने टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष शक्तीवान भोईर, महिला अध्यक्ष मनिषा केळकर ,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ पातकर, अमोल केदार,दिपक कांबळे, रुपेश भोईर, किरण रोठे ,संतोष शिंगोळे, मुन्ना,बजरंग अग्रवाल, अंजली सरनोबत, लिना कांबळे,,,,,आदी उपस्थित होते,,
यावेळी मौचै मध्ये असंख्य महिला पुरुष सहभागी झाले होते,
यावेळी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर यांनी सांगितले की मांडा टिटवाळा पश्चिम भागात अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे, तर काहींना पाणी मिळत नाही, वॉलमनच्या मनमानी कारभाराच्या अनेक तक्रारी असुन त्यामुळे देखिल नागरीकाना त्रास सहन करावा लागत आहे. हया भागांत आठ इंच पाईप लाईन आहे, ती बदलून नवीन मोठी लाईन टाकणे गरजेचे आहे, तसेच टिटवाळा येथील बंधारा याची उंची वाढवणे गरजेचे आहे व आदी मागण्या निवेदनात दिल्या आहेत, सदर मागणी पुर्ण करण्याचे आश्वासन अधिकारी यांनी दिले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web