प्रतिकूल परिस्थितीत कचरावेचक १४ मुलांनी दहावीच्या परीक्षेत मारली बाजी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – ‘ज्यांचं कचरा हेच आयुष्य असले तरी कचरा हेच भविष्य’ बनू नये यासाठी कल्याणच्या डंपिंग ग्राऊंडवर राहणाऱ्या कचरावेचक मुलांनी आता कंबर कसली आहे. बारावीच्या परीक्षेपाठोपाठ आज जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेतही डंपिंग ग्राऊंडवरील घवघवीत यश मिळवले आहे.प्रतिकूल परिस्थितीत आभ्यास करून परीक्षेत बाजी मारणे खूप मोठी बाब आहे.

विशेष म्हणजे उत्तीर्ण झालेल्या 14 विद्यार्थ्यांपैकी 9 विद्यार्थिनी आहेत. हे सगळे विद्यार्थी आपल्या आई-वडीलांना कचरा वेचण्यास मदत करत असतात. कचरा वेचूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असतो. या वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुबंध संस्था मार्गदर्शन करत आहे. उत्तीर्ण झालेल्या या विद्यार्थ्यांमध्ये संध्या संतोष गायकवाड ६१ टक्के, पौर्णिमा बंडू चव्हाण ६१ टक्के, पायल किशोर वाघमारे ५७.४० टक्के, रुपाली कृष्णा घुले ५४.८० टक्के, ऋतिक सुनील कांबळे ४२ टक्के, मनिषा पांडुरंग वाघे ६२.६० टक्के, कुणाल बळीराम वाघे ५४ टक्के, भाग्यश्री बबल्या वाघे ५९.२० टक्के, मनाली पपन वाघे ६६ टक्के, भरत लडकु वाघे ६१.२० टक्के, नीलम हरिश्चंद्र वाघे ५८ टक्के, बबली बुधाजी वाघे ५७.६० टक्के, सूर्या हनुमान वाघे ५६.४० टक्के, आदित्य मारुती वाघे ५६.४० टक्के असे उत्तम गुण मिळाले आहेत.

आपण असे अनेक जण बघतो ज्यांच्याकडे आयुष्यात पुढे जाण्यासाठी सर्व काही असते. तर दुसरीकडे डंपिंग ग्राऊंडवरील मुलांसारखे असेही विद्यार्थी आहेत की जे काहीही नसतानाही केवळ आपल्या जिद्दीच्या जोरावर एक एक पाऊल पुढे टाकत आहेत. ज्यांचं कौतुक करावे तेवढे कमीच असेल.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web