नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – विविध मागण्यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.जिल्हाध्यक्ष आनंद नवसागरे, शहर अध्यक्ष दामू काउतकर आणि कामगार नेते रमेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली कल्याण मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्याना पासून ते महानगर पालिका केडीएमसी मुख्यालया पर्येंत हा मोर्चा काढण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांच्या नावे दावडी पेट्रोल पंपाजवळ गोळवली येथील जागेवर होत असलेल्या अतिक्रमणाकडे महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. तसेच गोविंदवाडी बायपास रस्त्याच्या विकास कामात 2005 साली 108 कुटुंबे बाधित झाली. त्याचे पुनर्वसन अद्याप करण्यात आलेले नाही. त्यांना महापालिकेच्या बीएसयूपी योजनेत पुनर्वसन करावे. बीएसयूपी योजनेत बेकायदेशीरपणो घरे देणा:या अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी मोठ्या संख्येने रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.