खेळ, कोडी,कॉमिक्सच्या माध्यमातून मुलांमध्ये कर साक्षरता पसरवण्याचा आयकर विभागाचा उपक्रम

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

मुंबई – CBDT अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मजकुरावर आधारित साहित्य, जनजागृती चर्चासत्रे आणि कार्यशाळा यांच्या पलीकडे जाऊन कर साक्षरता पसरवण्यासाठी एक अभिनव दृष्टिकोन स्वीकारला आहे. कर आकारणीशी संबंधित संकल्पना मांडण्यासाठी त्यांनी बोर्ड गेम्स, कोडी अशी विविध उत्पादने आणली आहेत.  या उपक्रमाची सुरुवात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली. पणजी, गोवा येथे आझादी का अमृत महोत्सव आयकॉनिक वीकचा समारोप समारंभात उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये त्यांनी या उत्पादनांच्या पहिल्या सेटचे वाटपही केले. पुढची 25 वर्षे हा अमृत काळ असेल आणि नव भारताला आकार देण्यासाठी युवक महत्त्वाची भूमिका बजावतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

CBDT ने आणलेली नवीन उत्पादने खालीलप्रमाणे आहेत:

साप, शिडी आणि कर: या बोर्ड गेममध्ये कर आणि आर्थिक व्यवहाराशी संबंधित चांगल्या आणि वाईट सवयींचा परिचय होतो. चांगल्या सवयींना शिडीद्वारे पुरस्कृत केले जाते आणि वाईट सवयींना साप दंड करतात.

बिल्डिंग इंडिया : हा सहयोगी खेळ पैसे देण्याची महत्त्वाची संकल्पना मांडतो.

पायाभूत सुविधा आणि सामाजिक प्रकल्पांवर आधारित 50 मेमरी कार्ड वापरून हा खेळ खेळला जातो. कर आकारणी सहयोगी आहे आणि स्पर्धात्मक नाही हा संदेश हा खेळ देतो.

इंडिया गेट – 3D कोडे : या गेममध्ये 30 तुकड्यांचा समावेश आहे, प्रत्येकामध्ये माहिती आहे. कर आकारणीशी संबंधित विविध अटी आणि संकल्पनांबद्दलचे तुकडे एकत्र जोडलेल्यावर इंडिया गेटची त्रि-आयामी रचना तयार होते. जो कर निर्माण करतो. हे कर राष्ट्रबांधणीत चांगले योगदान देतात असा संदेश त्यातून मिळतात.

डिजिटल कॉमिक बुक्स – आयकर विभागाने या उपक्रमात लॉट पॉट कॉमिक्स सोबत सहकार्य केले आहे.
मुले आणि तरुणांमध्ये उत्पन्न आणि कर आकारणीच्या संकल्पनांबद्दल जागरूकता पसरवणे यासाठी ही पुस्तके तयार केली आहेत. मोटू-पतलूच्या प्रचंड लोकप्रिय कार्टून पात्रांनी त्यांच्या आकर्षक संवादांमधून हे संदेश दिले आहेत.

आयकर विभागाची कार्यालये भारतभर पसरली आहेत. त्यामुळे
ही उत्पादने सुरुवातीला आयकर विभागाच्या नेटवर्कद्वारे शाळांमध्ये वितरित केली जातील. या खेळांचे पुस्तकांच्या दुकानातून वितरण करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web