नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – पेट्रोल डीझेलची दर वाढ झाली म्हणजे सर्वसामान्य जनतेला याची झळ मोठ्या प्रमाणात जाणवते.जीवनाश्यक प्रत्येक गोष्ट पेट्रोल डिझेलच्या दर वाढीमुळे महागते.केंद्र सरकारने पेट्रोल डीझेलचे भाव कमी केले, महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल डीझेलचे कर कमी केला नाही. जनतेची राज्य सरकारला खरच काळजी असती तर त्यांनी पेट्रोल डिझेल दर कमी केले असते. पेट्रोल डीझेलचे दर महाविकास आघाडी सरकारने कमी केले पाहिजे होते. जीएसटी परताव्याचे कारण सांगत त्यांनी पेट्रोल डीझेलचे दर कमी केले नाही. असे केल्यामुळे महाविकास सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्याच बरोबर काहीही झाले तर केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. राज्य सरकारला महागाई कमी करण्यात नाही तर लोकांची दिशाभूल करण्यात स्वारस्य आहे अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशन या कल्याण डोंबिवलीतील पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमांत ते बोलत होते.
आगामी काळातील सर्व निवडणुकीत भाजप १००% निवडून येणार आहे असा ठाम विश्वास केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी व्यक्त केला. त्याच बरोबर त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुकही केले. आता फडणवीस मुख्यमंत्री नाही पण त्यांच्या कार्यामुळे त्यांची लोकप्रियता आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ५ वर्षात जे काम केले. त्यामुळे जनता त्यांच्या मागे आहे. शरद पवार व देवेंद्र फडणवीस हे असे महाराष्ट्राचे दोन नेते आहे की त्यांच्याकडे कोणतेही पद जरी नसले तरी जनते मध्ये त्यांचा मान सन्मान मोठा आहे. असे हि ते म्हणाले.
त्याच बरोबर जुलै मध्ये होणाऱ्या राष्ट्रपती निवडणुकीबाबत भाकीत करत १००% भाजपाचा उमेदवार निवडून येणार आहे असे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील असे म्हणाले. ममतादिदींनी कितीही प्रयत्न केले तरी काहीही उपयोग होणार नाही राष्ट्रपती मोदीच्या नेतृत्वा खाली भाजपचा उमेदवार निवडून येणार असा ठाम विश्वास मंत्री मोहदय यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
त्याच बरोबर सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास व त्यांत आलेले अनुभवही केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी निर्भय जर्नलिस्ट फाऊंडेशनच्या कार्यक्रमांत सांगितले.