राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्‍ली – भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/एजन्सी यांच्यामार्फत  त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आणि इतर सामाजिक कार्यामध्‍ये असामान्य योगदान देणा-या लोकांचा गौरव करण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या कार्याला ओळख निर्माण करून देण्‍यासाठी अनेक नागरी पुरस्कार प्रदान केले जातात.

विविध पुरस्कारांसाठी नामांकने  आमंत्रित करण्यासाठी, तसेच भारत सरकारच्या विविध मंत्रालये/विभाग/संस्थांचे  सर्व पुरस्कार डिजिटल मंचावर एकत्र आणण्यासाठी सरकारने एक समान राष्ट्रीय पुरस्कर पोर्टल (https://awards.gov.in) विकसित केले आहे. पारदर्शकता आणि जन भागीदारी सुनिश्चित करण्यासाठी  डिजिटल मंचाअंतर्गत या पुरस्‍कारांसाठी अर्ज मागवले जाणार आहेत;  या पोर्टलचे उद्दिष्ट भारत सरकारच्या  विविध पुरस्कारांसाठी व्यक्ती/संस्थांना नामनिर्देशित करण्यासाठी नागरिकांना सुविधा देणे हा आहे.

सध्या, खालील पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी खुल्या आहेत:

  1. पद्म पुरस्कार- नामांकन 15/09/2022 पर्यंत खुले आहे. 
  2. सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कार- नामांकन 31/07/2022 पर्यंत खुले आहे.
  3. तेनझिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहे
  4. जीवन रक्षा पदक पुरस्कार- नामांकन 30/09/ 2022 पर्यंत खुले आहे. 
  5. पंडित दीनदयाळ उपाध्याय दूरसंचार कौशल्य उत्कृष्टता पुरस्कार- नामांकन 16/06/2022 पर्यंत खुले आहे. (https://awards.gov.in )

अधिक तपशीलांसाठी आणि नामांकनासाठी, कृपया राष्ट्रीय पुरस्कर पोर्टलला भेट द्यावी.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web