कल्याण मधील इमारतीची पार्किंग लिफ्ट कोसळली,तीन कर्मचारी जखमी

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – कल्याणातील माणिक कॉलनी येथील पुण्योदय स्काय इमारतीच्या पार्किंग लिफ्टचे तांत्रिक काम सुरु असताना अचानकपणे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान लिफ्ट कोसळल्याची घटना घडली या घटनेत लिफ्ट मध्ये काम करीत असलेले चार कर्मचारी जखमी झाले त्यातील कर्मचार्याना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी व पोलिसांनी त्वरित घटना स्थळी धाव घेतली.सुदैवाने मोठी मनुष्यहानी टळल्याने इमारीतील रहिवाश्यांनी सुटकेचा निश्वास सोडला .पश्चिमेतील माणिक कॉलनीची बहुमजली इमारत असून या इमारतीच्या पार्किंग लिफ्टच्या तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरु होते. दुरुस्ती व तपासणीचे सुरु असताना अचानक पणे लिफ्ट कोसळली.पार्किंग लिफ्ट मधून गाडी नेत टेस्टिंग करत असताना घटना घडली आहे.

त्या लिफ्टमध्ये दुरुस्तीचे काम करणारे चार कर्मचारी होते. लिफ्ट कोसळल्याचा जोरदार आवाज होताच इमारतीच्या सुरक्षा रक्षकासह अन्य नागरीकांनी लिफ्टच्या दिशेने धाव घेतली. लिफ्टमध्ये अडकलेल्या चार कर्मचा र्यांना तातडीने बाहेर काढण्यात आले. लिफ्ट मधील चारही जखमी झाले असून त्या कर्मचाऱ्याना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती तेथील रहिवाश्यांनी दिली. बाजारपेठ पोलिसांनी घटनेची नोंद करून तपास सुरु केला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web