खेलो इंडियात महाराष्ट्राची विजयी घोडदौड, योगा आणि सायकलिंग मध्ये सुवर्ण पदके

नेशन न्यूज मराठी टीम.

पंचकुला – महाराष्ट्राने खेलो इंडिया स्पर्धेच्या चौथ्या दिवशीही आपले कसब दाखवले. सायकलिंग आणि योगासनात सुवर्णपदक पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळाले. कबड्डीतही मुलांच्या संघात तिसरे स्थान मिळाले आहे. मुलींनी मात्र कबड्डीत फायनल गाठली आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने अंतिम फेरीत धडक मारली. आज सायंकाळपर्यंत झालेल्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राने २ सुवर्ण, ६ रौप्य व ५ कांस्य अशी पदके पटकावली. सायकलिंगमध्ये १ सुवर्ण, १ रौप्य व १ कांस्य पदक मिळाले. जिम्नॅस्टिकमध्ये १ रौप्य, १ कांस्य, तर वेटलिफ्टिंगमध्ये १ कांस्य, योगामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य व १ कांस्य, योगामध्ये १ सुवर्ण, २ रौप्य तर १ कांस्य पदक मिळाले. कुस्तीत २ रौप्य व १ ब्रांझ पदक जिंकले.

ट्रॅक सायकलिंगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा बबन दोनाळेने (कोल्हापूर) सुवर्ण पदक जिंकले. याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले. स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्य पदक जिंकले.

योगामध्ये आर्टिस्टिक ग्रुप प्रकारात जय कालेकर, प्रीत बोरकर, रूपेश सांगे, सुमित बंडाळे, ओम राजभरने रौप्य पदक जिंकले. मुलींमध्ये या प्रकारात मृणाल बानाईत, रूद्राक्षी भावे, स्वरा गुजर, तन्वी रेडीज, गीता शिंदे यांनी रौप्य पदक जिंकले. वेटलिफ्टिंगमध्ये राणी रानमाळे हिने ५५ किलो वजनगटात १५९ किलो वजन उचलून कांस्य पदक पटकावले

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web