खेलो इंडिया युवा स्पर्धा हरियाणा २०२२ साठी महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना

नेशन न्यूज मराठी टीम.

पुणे – हरियाणा येथे होत असलेल्या चौथ्या ‘खेलो इंडिया’ युवा स्पर्धांसाठी बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडापीठ येथील सराव शिबिरानंतर महाराष्ट्राचा कबड्डी संघ रवाना झाला. बालेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून संघाने पदक मिळवण्याचा निर्धार केला. क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रीडा विभागाचे सहसंचालक चंद्रकांत कांबळे हे स्पर्धेचे समन्वय अधिकारी आहेत. क्रीडा अधिकारी अरूण पाटील हे मुख्य व्यवस्थापक आहेत. त्याच बरोबर इतर पदाधिकारीदेखील महाराष्ट्राच्या संघासोबत आहेत. गीता साखरे (पुणे) या मुलींच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षक, राजेश पाडावे (मुंबई) मुलांच्या संघाचे प्रशिक्षक आणि  क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे हे संघ व्यवस्थापक आहेत.

चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेचे ४ जून रोजी उद्घाटन होईल आणि १३ जून रोजी स्पर्धेची सांगता होणार आहे. आजपासून हे संघ हरियाणाकडे रवाना होत आहेत. ८ जूनपर्यंत सर्व संघ तिकडे रवाना होतील.

क्रीडामंत्री सुनील केदार- यावर्षी यशस्वी खेळाडूंसाठी बक्षिसाची रक्कम वाढविण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. तो नक्कीच खेळाडूंचा उत्साह वाढविणारा ठरेल. बालेवाडी येथे सुरू असलेला खेळाडूंचा सराव पाहता नक्कीच महाराष्ट्र क्रमांक एक मिळवेल असा विश्वास वाटतो. देशात कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्राला सर्वाधिक क्रीडासुविधा दिल्या जातील.

क्रीडा राज्यमंत्री कु.आदिती तटकरे- महाराष्ट्राचे खेळाडू प्रत्येक क्रीडा प्रकारात उत्तम कामगिरी करीत आहेत. यावर्षीदेखील महाराष्ट्र हॅटट्रीक करेल. गेल्या दोन-तीन वर्षांपासून शासन खेळाडूंना विशेष सुविधा देत आहे. यापूर्वी खेळाडूंना आपापल्या जिल्ह्यातून प्रवास करून स्पर्धेच्या ठिकाणी पोचावे लागत असे. त्यामुळे त्याचा कामगिरीवर परिणाम होत असे. परंतु, आता महाराष्ट्र सरकार आणि क्रीडा विभागाने खेळाडूंना प्रवासाचा त्रास होऊ नये म्हणून जाण्या-येण्यासाठी थेट विमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

मुलांचा संघ –

भरत भवर, प्रशांत नगरे, अमरसिंग कश्यप, पृथ्वीराज चव्हाण, वैभव रबडे, युवराज शिंदे, दादासाहेब पुजारी, पृथ्वीराज शिंदे, जयेश महाजन, श्रीपाद पाटील, सचिन म्हसरूफ, रोहन तुपारे.

मुलींचा संघ –

हरजीत कौर संधू, शिवरंजनी पाटील, आरती ससाणे, कोमल ससाणे, रिद्धी हडकर, हर्षदा पाटील, किरण तोडकर, मनिषा राठोड, निकिता लंगोटे, याशिका पुजारी, मुस्कान लोखंडे, ऋतुजा अवघडी.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web