नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – राष्ट्रीय औष्णिक उर्जा लिमिटेड (नॅशनल थर्मल पॉवर काॅरपोरेशन) या भारतातील सर्वात मोठ्या एकात्मिक ऊर्जा उत्पादन कंपनीने जैवविविधतेचे संवर्धन, परिरक्षण आणि पुनर्स्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टी आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रस्थापित करत जैवविविधता धोरण 2022चे नूतनीकरण करून ते जाहीर केले आहे.
जैवविविधता धोरण एनटीपीसीच्या समग्र पर्यावरण धोरणाचा अविभाज्य घटक आहे.त्याची उद्दिष्टे पर्यावरण आणि शाश्वत धोरणांशी सुसंगत आहेत.याशिवाय,एनटीपीसी समूहाच्या सर्व व्यावसायिकांना या क्षेत्रात निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी योगदान देण्यास सहाय्य करण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले आहे.