आरपीएफच्या कर्मचाऱ्यांचा रेल्वेमंत्री यांच्या हस्ते सत्कार

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – रेल्वे संरक्षण दलाचा अलंकरण समारंभ 27 मे 2022 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवनात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते, आरपीएफ च्या 104 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्य पुरस्कार, विशिष्ट सेवेसाठीची पोलीस पदके, अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदके, आणि जीवन रक्षा पदके देऊन,राष्ट्रपतींच्या हस्ते, वर्ष 2019, 20 आणि 21 मध्ये सन्मानित करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. दिवंगत जगबीर सिंग यांच्या पत्नी सुनीता देवी यांनी त्यांच्या वतीने वैष्णव यांच्याकडून गौरव स्वीकारला, हा क्षण सर्वांनाच हेलावून टाकणारा होता. त्यांचेयजमान, दिवंगत जगबीर दिल्ली जवळच्या आदर्शनगर-आझादपूर रेल्वे स्थानकावर, रेल्वेरुळांवर अडकलेल्या चार मुलांचे जीव वाचवतांना आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. अतुलनीय शौर्य आणि धाडसी वृत्तीने, या संकटात त्यांनी आपल्या कर्तव्याच्याही पलीकडे जात, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, या मुलांचा जीव वाचवला. त्यांना त्यांच्या या बलिदानासाठी, मरणोत्तर, राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने तसेच जीवन रक्षा पदक देऊन गौरवण्यात आले होते.

या कार्यक्रमात बोलतांना आरपीएफचच्या महासंचालकांनी, आरपीएफ चे रेल्वे संरक्षण दलापासून, ते अत्यंत आत्मीयता आणि करुणेने, प्रवाशांची सेवा करणारा विभाग म्हणून कसे परिवर्तन कसे झाले, याची थोडक्यात माहिती दिली.

तसेच, आरपीएफ च्या विविध उपलब्धी आणि प्रवासी सुरक्षा आणि मदत, बालकांची सुटका, मानवी तस्करी, समुदाय जागृती यासाठी सुरु केलेल्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. रेल्वे सुरक्षा दलाची सेवाप्रवण वृत्ती, त्यांचे घोषवाक्य, ‘सेवा ही संकल्प’ मधून व्यक्त होते, असेही त्यांनी सांगितले. रेल्वे प्रवासात असतांना प्रवाशांनीही जागरुक असावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आणि काहीही अडचण आली तर,आरपीएफ ला संपर्क करावा अशी सूचना त्यांनी केली.

याच समारंभात वैष्णव यांनी आरपीएफच्या जर्नल, आरपीएफची प्रशिक्षण पुस्तिका आणि आरपीएफ सराव पुस्तिकेचेही प्रकाशन केले. त्याशिवाय, केंद्रीय कमांड आणि कंट्रोल सेंटरचा पायाभरणी समारंभही त्यांच्या हस्ते झाला. ह्या केंद्राद्वारे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून रेल्वेच्या सर्व व्यवहारांवर देखरेख, विश्लेषण आणि निरीक्षण केले जाईल. तसेच, सीआरआयएस च्या आरपीएफ साठीच्या समर्पित संकेतस्थळाचे उद्घाटनही आज करण्यात आले. आरपीएफची प्रतीमा व्यवस्थापन आणि सुप्त कौशल्य विकसित करण्यासाठी या संकेतस्थळाचा उपयोग होईल.

आरपीएफ ने एकटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेसाठी “मेरी सहेली’ हा उपक्रम सुरु केला आहे. मेरी सहेली मोडयूल सीआरआयएस च्या सहकार्याने विकसित करण्यात आले असून त्याचेही वैष्णव यांनी उद्घाटन केले. याद्वारे मेरी सहेलीच्या चमू मध्ये प्रत्यक्ष कार्य स्थळी अधिक सुसंवाद आणि देखरेख करण्यास मदत होईल.आरपीएफ ने केलेले कां दाखवण्यासाठी आणि लोकांमध्ये जागृती करण्यासाठी, आरपीएफच्या एका समर्पित यू ट्यूब वाहिनीचेही उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेमध्ये परिवर्तन घडून येण्यासाठी गरजेच्या पाच मुलभूत तत्वे, जसे की अंत्योदय, तंत्रज्ञानाचा अंगीकार, गुंतवणूक, संस्थात्मक पुनर्रचना आणि जमिनीवर काम करण्याऱ्या गटांचे सक्षमीकरण, हे त्यांनी अधोरेखित केले.

या पाच तत्वांच्या आराखड्यात रेल्वे सुरक्षा दलाची भूमिका महत्वाची आहे, कारण रेल्वे सुरक्षा दल हे रेल्वे प्रशासन आणि जनता यांच्यातला दुवा आहे, असे ते म्हणाले. “सबका प्रयास” द्वारे रेल्वेची सुरक्षा मजबूत करण्यात येईल असे सुतोवाच त्यांनी केले.

विशेष भांडवली गुंतवणुकीमुळे रेल्वे सुरक्षा दलात परिवर्तानात्मक बदल घडून येतील असे त्यांनी सूचित केले. हरियाणामधील जगधारी इथे रेल्वे सुरक्षा दर कमांडो प्रशिक्षण केंद्र उभारण्यास 30 कोटी रुपये मंजूर केल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web