संरक्षण क्षेत्रातील निवृत्तीवेतनधारकांनी वार्षिक ओळखपत्रांची पूर्तता २५ जून पर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन

     

नेशन न्यूज मराठी नेटवर्क.

नवी दिल्ली – संरक्षण मंत्रालयाने, संरक्षण क्षेत्रातील सर्व निवृत्तीवेतन धारकांना त्यांची निवृत्ती वेतनासाठीची ओळखप्रक्रिया/हयातीचा दाखला 25 जून 2022 पर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

25 मे 2022 पर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार असे लक्षात आले की, 34,636 निवृत्तीवेतन धारक, ज्यांनी आता स्पर्श (SPARSH) पोर्टलवर नोंदणी केली आहे, त्यांनी आपली वार्षिक ओळखप्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे आढळले आहे. ऑनलाईन नाही, आणि त्यांच्या संबंधित बँकेतही नोव्हेंबर 2021 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्याचे आढळले आहे. एप्रिल 2022 मध्ये अशा 58,275 निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात एक महिन्याची (एकदाच मिळणारी) विशेष सवलत म्हणून निवृत्तीवेतन जमा करण्यात आले आहेत ( हे निवृत्तीवेतन धारक स्पर्श पोर्टलवर नोंदणी केलेल्या 4.47 लाख कर्मचाऱ्यांपैकी आहेत), कारण त्यांची  वार्षिक ओळखप्रक्रिया त्यांच्या बँकांना महिना अखेर पूर्ण करता आली नाही .

दर महिन्यात निवृत्तीवेतन धारकांना त्यांची पेन्शन सुरळीतपणे मिळत राहावी यासाठी वार्षिक ओळखप्रक्रिया/ हयातीचा दाखला देणे कायद्यानुसार बांधकारक आहे.  जर ही वार्षिक ओळखप्रक्रिया/ हयातीचा दाखला दिला गेला नसेल, तर, तो ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष भरण्यासाठी  25 मे 2022 पर्यंतची मुदत दिली गेली होती. मात्र आता ही मुदत 25 जून 2022 पर्यंत वाढवली आहे. 

वार्षिक ओळखप्रक्रिया/ हयातीचा दाखला देण्याची प्रक्रिया खालीलप्रकारे पूर्ण करता येईल:

1. डिजिटल जीवन प्रमाणच्या माध्यमातून ऑनलाईन/ अँन्ड्रॉईड फोन वापरकर्त्यांसाठी जीवन प्रमाण फेस ॲप च्या माध्यमातून

a.हे ॲप इनस्टॉल करणे आणि वापरण्याची सविस्तर माहिती या लिंकवर मिळेल:

https://jeevanpramaan.gov.in/package/documentdowload/JeevanPramaan_FaceApp_3.6_Installation

b.स्पर्श (SPARSH)निवृत्तीवेतनधारक : मंजूर करणारे अधिकारी म्हणून कृपया “ संरक्षण– PCDA (P)अलाहाबाद”आणि वितरण अधिकारी म्हणून  “SPARSH – PCDA (निवृत्तीवेतन) अलाहाबाद, ची निवड करा.

c.लिगसी पेन्शनर (2016 च्या आधी निवृत्त झालेले): तुमचे अर्ज मंजूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची निवड करा, ती – “संरक्षण- Jt.CDA (AF) सुब्रोतो पार्क” किंवा “संरक्षण- PCDA (P) अलाहाबाद किंवा “संरक्षण- PCDA (Navy-नौदल), मुंबई आणि वितरण अधिकाऱ्यांची तुमच्या संबंधित बँक/डीपीडिओ इत्यादीसाठी निवड

2. निवृत्तीवेतन धारक त्यांच्या घराजवळच्या सामाईक सेवा केंद्रात जाऊनही ही ओळखप्रक्रिया करु शकतात . त्यासाठी, खालील लिंकवर त्यांना त्यांच्या जवळचे सामाईक सेवा केंद्र कुठे आहे, याची माहिती मिळू शकेल : https://findmycsc.nic.in/

3.तसेच, निवृत्तीवेतन धारक, त्यांच्या घराजवळील DPDO मध्ये जाऊन देखील आपला हयातीचा दाखला देऊ शकतात. वारसा हक्काने जे निवृत्तीवेतन मिळवत आहेत, तेही  आपल्या संबंधित बँकेत, त्यांचा हयातीचा दाखला देऊ शकतात.     

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web