महाराष्‍ट्र, बिहार, उत्तर प्रदेश विधानपरिषदेसाठी व्दैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

नेशन नुज मराठी नेटवर्क.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि बिहार विधानपरिषदेमधून 06.07.2022 ते 21.07.2022 या कालावधीत निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या व्दैवार्षिक निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, आणि बिहार विधानपरिषदांच्या ३० सदस्यांचा कार्यकाळ संपुष्‍टात येत आहे. त्या जागा भरण्‍यात येणार आहेत.

महाराष्ट्रातील सदस्य पुढीलप्रमाणे

क्र .सदस्यनिवृत्ती दिनांक
 सदाशिव रामचंद्र खोत    07.07.2022 
 सुजितसिंह मानसिंह ठाकूर
 प्रवीण यशवंत दरेकर
 सुभाष राजाराम देसाई
 रामराजे प्रतापसिंह नाईक-निंबाळकर
 संजय पंडितराव दौंड
 विनायक तुकाराम मेटे
 प्रसाद मिनेश लाड
 दिवाकर नारायण रावते
 रामनिवास सत्यनारायण सिंह ( 02.01.2022 पासून रिक्त )

या निवडणुकीसाठी अधिसूचना दि. 2 जून, 2022 रोजी जारी करण्‍यात येणार आहे. तसेच निवडणूक अर्ज भरण्‍याची अंतिम तारीख 9 जून, 2022 पर्यंत आहे. अर्जांची छाननी 10 जून, 2022 रोजी होणार असून, 13 जून, 2022 पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदान 20 जून रोजी सकाळी 9.00 ते सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत होणाार असून त्याचदिवशी सायंकाळी 5.00 वाजता मतमोजणी होणार आहे.

S. No.EventsDates
 Issue of Notification02nd June, 2022 (Thursday)
 Last Date of making nominations09th June, 2022 (Thursday)
 Scrutiny of nominations10th June, 2022 (Friday)
 Last date for withdrawal of candidatures13th June, 2022 (Monday)
 Date of Poll20th June, 2022 (Monday)
 Hours of Poll09:00 am- 04:00 pm
 Counting of Votes20th June, 2022 (Monday) at 05:00 pm
 Date before which election shall be completed22nd June, 2022 (Wednesday)

आयोगाने कोविड 19बाबत जारी केलेल्या विस्तृत मार्गदर्शक सूचना 02.05.2022 पत्रकाच्या परिच्छेद 06मध्ये दिल्या असून त्या पुढील लिंक वर उपलब्ध आहेत. जिथे लागू असेल तिथे संपूर्ण प्रक्रियेत सर्व व्यक्तींनी त्याचे पालन करावे. https://eci.gov.in/files/file/14151-schedule-for-bye-election-in-3-assembly-constituencies-of-odisha-kerala-and-uttarakhand%E2%80%93-reg/

संबंधित राज्यांच्या मुख्‍य सचिवांनी या निवडणुकीचा कार्यक्रम पार पाडण्‍यासाठी आवश्‍यक त्या उपाय योजना करण्‍याविषयी निर्देश आयोगाने दिले आहेत.

निवडणुका आयोजित करताना कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सध्याच्या सूचनांचे पालन केले जात आहे याची खात्री करण्यासाठी संबंधित मुख्य सचिवांना राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web