२७ मे रोजी निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी ‘पेंशन अदालत’ चे आयोजन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – महाराष्ट्र शासनातीत निवृत्त कर्मचाऱ्यांकरिता अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे दिनांक 27 मे 2022 रोजी सकाळी 11 पासून पेंशन अदालतचे आयोजन करण्यात येत आहे. प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी), महाराष्ट्र 1 मुंबई येथील अधिकारी अधिदान व लेखा कार्यालय, वांद्रे पूर्व, मुंबई येथे निवृत्तीवेतन संबंधित समस्या आणि मागण्यांचे निराकरण करण्यासाठी उपस्थित राहतील.

प्रधान महालेखाकार (लेखा व हकदारी) महाराष्ट्र- 1 मुंबई कार्यालयाने निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीकरीता अनेक उपक्रम राबविले आहेत. जसे साप्ताहिक ऑनलाईन पेशन संवाद, 24 तास उपलब्ध टोल फ्री नं. 1800-22-0014/ 24/7 व्हॉइस मेल नं. 020-71177775, माहिती वाहिनी, पेंशन सेवापत्र आणि जीपीएफ सेवापत्र, पेन्शनर्संकरीता समर्पित ई-मेल: helpdesk.mhlaebeag.gov.in या उपक्रमांची माहिती पेन्शन अदालतमध्ये देण्यात येईल.

मुंबई शहर व मुंबई उपनगरातील सर्व निवृत्तीवेतनधारक संघटनांचे प्रतिनिधी व त्यांचे सदस्य यांनी या अदालतमध्ये कृपया सहभागी व्हावे, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी श्रीमती रश्मी नांदिवडेकर यांनी केले आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web