नेशन न्यूज मराठी टीम.
नवी दिल्ली – स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त सांस्कृतिक मंत्रालय राजा राम मोहन रॉय यांचे २५० वे जयंती वर्ष साजरा करणार आहे. 22 मे 2022 पासून 22 मे 2023 या कालावधीत हे वर्ष साजरे केले जाणार असून त्याचा शुभारंभ उद्या कोलकाता इथे होणार आहे.
कोलकात्यातील सॉल्ट लेक इथे असलेली राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशन आणि सायन्स सिटी प्रेक्षागृहात केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन व ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्री जी किशन रेड्डी ह्यांच्या हस्ते २२ मे २०२२ रोजी हा उद्घाटन सोहळा होणार आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धन्कर ह्या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
राजा राम मोहन रॉय लायब्ररी फाउण्डेशन इथे राजा राम मोहन रॉय ह्यांच्या पुतळ्याचे अनावरण सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी सकाळी ११ वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे करतील.
उद्घाटनाच्या निमित्ताने सायन्स सिटी प्रेक्षागृहात इतरही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्र, लहान मुलांसाठी प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले आहे. राजा राम मोहन रॉय ह्यांच्या जीवनाचे विविध पैलू उलगडून दाखवणारे सादरीकरण मल्टिमिडीयाद्वारे केले जाणार आहे.