संकष्ट चतुर्थीनिमित्त टिटवाळा गणपती मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी

नेशन न्यूज मराठी टीम.

टिटवाळा – संकष्ट चतुर्थीनिमित्त गणपती मंदिरात पहाटे पासूनच भाविकांनी श्रीगणेशाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. मोठ्या संख्येने आलेल्या भाविकांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत श्री गणेशाचे दर्शन घेतले .
अनेक ठिकाणांहून येणाऱ्या लांबून लांबून येणाऱ्या भक्तगणांनसाठी पहाटे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. सकाळीच दर्शनबारीत भक्तांनी देवाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. तसेच सभामंडपातदेखील शेकडो भक्तांनी गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष केला. भक्तीमय वातावरणात संपूर्ण मंदिर परिसर बाप्पाच्या जयघोषाने दणाणून गेला होता. चंदन उटी लावून दुग्ध अभिषेक करून बाप्पाला सोन्याच्या दागिन्याने व फुलांचा शृंगार करण्यात आला होता.
यावेळी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंदिर व्यवस्थापनाकडून उपाययोजना करण्यात आल्या होत्या. स्थानिक पोलीस स्टेशनकडूनही वाहतुकीच्या आणि सुरक्षेच्या बाबतीत विशेष व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांची गर्दी लक्षात घेता मंदिराकडून सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात आली होती. मात्र उन्हाचा कहर लक्षात घेता दुपार नंतर ही गर्दी ओसरली असल्याचे पाहयला मिळाले .

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web