८ कोटीचा सीजीएसटी घोटाळा उघड, एकाला अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – ठाणे केंद्रीय जीएसटी आयुक्तालयाने बनावट जीएसटी इनपुट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेट उघडकीस आणले असून दहिसर येथील एका फर्मच्या मालकाला अटक केली आहे. CGST मुंबई झोनच्या सेंट्रल इंटेलिजन्स युनिटच्या विशिष्ट इनपुटवर कारवाई करून, CGST ठाणे आयुक्तालयाच्या शाखेने मेसर्स जे.जे. लाइम डेपो विरुद्ध तपास सुरू केला. सदर कंपनी बांधकाम साहित्याचा व्यापार करत होती. या फर्मने त्यांच्या आर्थिक नोंदींमध्ये फसवणूक करून 8.05 कोटी रुपयांच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा केला होता. या फर्मने सीजीएसटी कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन करून, कोणत्याही वस्तूंचा पुरवठा न करता 40 कोटी हून अधिक रकमेच्या बोगस पावत्याही जारी केल्या होत्या. कमिशनसाठी अनेक मुंबईस्थित पायाभूत सुविधा कंपन्यांना बनावट पावत्या जारी केल्या असल्याचे या फर्मच्या मालकाने कबूल केले आहे.

CGST कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल त्याला 12.05.2022 रोजी CGST कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्याला आज 13.05.2022 रोजी माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी, एस्प्लानेड यांच्यासमोर हजर करण्यात आले.  न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

संभाव्य फसवणूक करणाऱ्यांना ओळखण्यासाठी CGST अधिकारी डेटा विश्लेषण आणि नेटवर्क विश्लेषण साधने वापरत आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षात, CGST ठाणे आयुक्तालयाने रु.1354 कोटी रुपये ची GST चोरी शोधली होती आणि 34 कोटी वसूल केले तसेच 7 करचोरी करणाऱ्यांना अटक केली.  CGST आयुक्तालय ठाणे या आर्थिक वर्षातही करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम सुरूच ठेवणार आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web