कल्याण मध्ये एम सी एच आयच्या वतीने प्रॉपर्टी एक्सपोचे आयोजन

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण – गेली 2 वर्ष कोरोना महामारीचा आपण सर्व सामना करत होतो. रोजच्या धावपळीत आपण घरात फार कमी वेळ राहायचो पण कोरोनाने आपल्या सर्वांना घरातच कोंडून ठेवल. जे घर बनवण्यासाठी आपण जीवाचं रान करतो त्याच घरात 24 तास राहणं आपल्याला नकोस झालं होत. स्वतःच घर नसल्यामुळे अनेकांना तर अनेक संकटाचा सामना करावा लागला होता. त्यामुळेच तर प्रत्येकाला स्वतःच्या घराचं महत्व आता कळलेलं आहे. या 2 वर्षात आम्ही सर्व विकासक देखील अशाच परिस्थितीचा सामना करत होतो. काम बंद होती. सामान मिळत नव्हते. कामगार काम सोडून गावी गेले होते. पण आता गेल्या 2 वर्षाचा हा काळ विसरून पुन्हा एकदा मोकळा श्वास आपण सर्व घेत आहोत. अनेकांचे घर घेण्याचं स्वप्न या काळात अर्धवट राहील होत. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिट सज्ज झाली आहे. आपल्याला हव तस आणि आपल्या बजेट मध्ये बसेल असं घर निवडणं ग्राहकांना आता सोप्प होणार आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिलन्यासाठी CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून प्रॉपर्टी एक्स्पोच आयोजन करण्यात आले आहे

प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असत स्वतःच्या हक्काचं आणि स्वतःच्या मालकीच घर असावं त्यामुळे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा CREDAI MCHI कल्याण डोंबिवली युनिटच्या माध्यमातून प्रॉपर्टी एक्स्पोच आयोजन करण्यात आले आहे. प्रॉपर्टी एक्स्पो चे हे 11 वे वर्ष असून येत्या 19 मे ते 22 मे दरम्यान कल्याण पश्चिम येथील लाल चौकी फडके मैदान येथे हा प्रॉपर्टी एक्स्पो भरणार आहे. 35+ डेव्हलपर्स आणि 150+ प्रोजेक्ट एका छताखाली ग्राहकांना बघता येणार आहेत. आणि गेल्या अनेक वर्षाचा अंदाज बघता या वर्षी 20 हजाराहून अधिक ग्राहक या एक्स्पो ला भेट देतील असा अंदाज आमच्या कमिटीला आहे.अशी महिती अध्यक्ष श्रीकांत शितोळे व रवी पाटील यांनी दिली

या प्रॉपर्टी एक्स्पोला ठाणे जिल्हा पालक मंत्री व सार्वजनिक बांधकाम तसेच नगरविकास मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल जी पाटील साहेब, गृह निर्माण मंत्री जितेंद्र जी आव्हाड साहेब, खासदार डॉ. श्रीकांत जी शिंदे साहेब, जिल्हाधिकारी राजेश जी नार्वेकर सर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त व प्रशासक डॉ. विजय जी सूर्यवंशी सर, आमदार विश्वनाथ जी भोईर साहेब, आमदार गणपत जी गायकवाड साहेब, आमदार रवींद्र जी चव्हाण साहेब, आमदार प्रमोद जी (राजू) पाटील साहेब तसेच अनेक मान्यवर भेट देणार आहेत. या वर्षी एक्स्पोला खास भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध सिने कलाकार सुपरस्टार श्री. श्रेयस तळपदे सर देखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web