महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या ५७ जागांसाठी १० जूनला निवडणूक

नेशन न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली – महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी दि. १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे.

भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या  एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .

महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, संजय राऊत आणि डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांचा कार्यकाळ ४ जुलै २०२२ रोजी संपत असल्याने राज्यातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त  होत आहेत. या जागांसह अन्य राज्यांतील राज्यसभेच्या एकूण ५७ जागांसाठी  १० जून २०२२ ला निवडणूक घेण्यात येणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

या निवडणुकांसाठी २४ मे रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम तारिख असून १ जून रोजी अर्जांची छाननी होणार आहे. ३ जूनपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. १० जून रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून  सायंकाळी ५ वाजता मतमोजणी  होऊन निकाल जाहीर होणार आहे. १३ जून २०२२ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे.

S.NoName of StateName of MemberDate of Retirement 
 Andhra Pradesh1Prabhu Suresh Prabhakar   21.06.2022
2T.G. Venkatesh
3Yalamanchili Satyanarayana Chowdary
4Venumbaka Vijaya Sai Reddy
 Telangana1Lakshmikanta Rao Voditela
2Srinivas Dharmapuri 
 Chhattisgarh1Chhaya Bai Verma   29.06.2022
2RamvicharNetam
 Madhya Pradesh1VivekkrishnaTankha
2Mobashar Jawed Akbar
3SampatiyaUikey
 Tamil Nadu1T.K.S. Elangovan
2A. Navaneethakrishnan
3R.S. Bharathi
4S.R. Balasubramoniyan
5A. Vijayakumar
6K.R.N. Rajeshkumar
 Karnataka1K.C. Ramamurthy 30.06.2022
2Jairam Ramesh
3Oscar Fernandes (Vacant w.e.f 13.09.2021)
4Nirmala Sitharaman
 Odisha1Nekkanti Bhaskar Rao 01.07.2022
2Prasanna Acharya
3Sasmit Patra
 Maharashtra1Goyal, Piyush Vedprakash   04.07.2022
2P. Chidambaram
3Patel, Praful Manoharbhai
4Mahatme, Vikas Haribhau
5Raut, Sanjay Rajaram
6Sahasrabuddhe, Vinay Prabhakar 
 Punjab1Ambika Soni          04.07.2022  
2Balwinder Singh
 Rajasthan1Omprakash Mathur
2AlphonsKannanthanam
3Ramkumar Verma
4Harshvardhan Singh Dungarpur
 Uttar Pradesh1Revati Raman Singh Urf Mani
2Sukhram Singh
3Syed Zafar Islam
4Vishambhar Prasad Nishad
5Kapil Sibbal
6Ashok Siddharth
7Jay Prakash
8Shiv Pratap
9Satish Chandra Misra
10Sanjay Seth
11Surendra Singh Nagar
 Uttarakhand1Pradeep Tamta 
 Bihar1Gopal Narayan Singh  07.07.2022
2Satish Chandra Dubey
3Misha Bharti
4Ramchandra Prasad Singh
5Sharad Yadav (Vacant w.e.f04.12.2017)
 Jharkhand1Mahesh Poddar
2Mukhtar Abbas Naqvi
 Haryana1Dushyant Gautam01.08.2022
2Subash Chandra

2. आता, आयोगाने खालील कार्यक्रमानुसार वर नमूद केलेल्या राज्यांमधून राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे:

अनु.क्र.कार्यक्रमतारीख
 अधिसूचना जारी करणे24 मे 2022 (मंगळवार)
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख31 मे  2022  (मंगळवार)
 अर्जाची छाननी1 जून 2022 (बुधवार)
 उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख3 जून, 2022 (शुक्रवार)
 मतदानाची तारीख10 जून 2022 (शुक्रवार)
 मतदानाची वेळसकाळी 9:00 ते संध्याकाळी  4:00
 मतमोजणी10 जून 2022 (शुक्रवार) संध्याकाळी 05:00 वाजता
 ज्या तारखेपूर्वी निवडणूक पूर्ण होईल13 जून 2022 (सोमवार)
Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web