नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – आंबिवली येथील अटाळी येथे कै गजानन हिरू पाटील विद्यामंदिर येथे ठाणे जिल्हा कोळी समाज कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला.या मेळाव्याचे उदघाटक केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे होते तर अध्यक्षस्थानी नारायण गजानन पाटील हे होते. या वेळी कोळी समाजाच्या प्रश्नांना वर चर्चा करण्यात आली.
या वेळी अनेक कार्यकर्त्यांनी कोळीवाडाड्याचा जमीनीचा सिमांकन प्रश्न उपस्थित केला.या वर बोलताना केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी हा प्रश्न राज्य सरकारच्या अखत्यारीतील असल्याचे या वेळी कपिल पाटिल यांनी सांगितले.त्याच प्रमाणे जर राज्याकडून या संदर्भात काही प्रस्थाव आला तर जमेल ती मदत करू आसे आश्वासन त्यांनी दिले. आपण सर्व भूमिपुत्र आहोत सर्वांनी एकी करून राहिले पाहिजे आसाही ते या वेळी म्हणाले.
आमदार गणपत गायकवाड यांनी हि मुख्यमंत्री यांना भेटून कोळी समाजाचे प्रश्न मांडणार आसल्याचे या वेळी आश्वासन दिले.
या कोळी समाज कार्यकर्त्याच्या मेळ्याव्यात नवनिर्वाचित अ भा कोळी समाजाचे प्रदेश अध्यक्ष परेश कांती कोळी यांची अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे त्यांचा सत्कार केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी परेश कोळी यांनी सागितले कि समजासाठी मी नवीन आखणी केली आहे तळागळातील कोळी बांधवान पर्येंत पोहचून आपल्या कोळी समाजाला सर्वतोपरी मदत कशी होईल याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कोळी समाज कार्यकर्ता मेळाव्यास केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या बरोबरच कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ भोईर, अ भा कोळी समाजाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महादेवबुआ शाहाबाजकर, अ भा कोळी समाजाचे कर्नाटक अध्यक्ष दत्ता रेड्डी, अभा कोळी समाजाचे राष्ट्रीय मंत्री देव राज, डी पी शंकरराव, कोळी समजाच्या महिला अध्यक्ष पुष्पाताई मढवी, महाराष्ट्राचे कोळी समाजाचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ कोळी, महाराष्ट्राचे सचिव अनिल ननावडे, तर मारुती गोटिराम पाटील, बंडू पाटील, मंगला तांडेल प्रमुख निमंत्रित होते.