राष्ट्रीय लोकअदालतीत कल्याण व डोंबिवली वाहतूक शाखेतील ७१६१ प्रकरणे निकाली तर ३४ लाख ५३ हजार दंड वसूल

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण – राष्ट्रीय लोक अदालीच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली शहरातील प्रलंबित ई चलनाचा प्रलंबित दंड असलेल्या वाहन चालक व मालकांना कल्याण ,डोंबिवली व कोळसेवाडी वाहतूक उप विभागाने नोटीसा बजावल्या होत्या त्या पैकी ७१६१ प्रकरणा मध्ये तडजोडी करण्यात आल्या असून यातून तब्बल ३४ लाख ५३ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती शहर वाहतुक उपशाखा कल्याण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली .

राष्ट्रीय लोक अदालती मध्ये झटपट न्याय मिळत असल्याने त्याला उत्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. कल्याण डोंबिवली शहरात वाहतूक नियंत्रणासाठी कल्याण ,डोंबिवली व कोळसेवाडी अशा तीन उप शहर वाहतुक शाखा विभाग आहेत या तिन्ही उप शहर वाहतूक विभागाच्या अंतर्गत १३ एप्रिल २०२२ ते ७ मे २०२२ या कालावधीत लाल सिग्नल तोडणे , वेगमर्यादेचे उल्लंघन, अपघात करून पळ काढणारे, हेल्मेट न घालणाऱ्या हजारो वाहनचालक व मालकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लघन केल्या प्रकरणी त्याच्यावर इ- चलनाद्वारे दंड आकारला होता. मात्र आकारलेल्या दंडाची रक्कम मान्य नसल्याने बहुतांश जण दंड भरणे टाळतात.अशा वाहनचालक व मालकांना कल्याण ,डोंबिवलीव कोळसेवाडी उप शहर वाहतूक शाखेकडून मोटारवाहन कायद्यान्वये तडजोडपात्र कारवाई अंतर्गत ज्या लोकांनी ई चलनाची रक्कम भरलेली नसलेल्या प्रकरणे तालुका विधी सेवा समिती कल्याण येथे शनिवारी ७ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालती समोर ठेवण्यात आल्या होत्या.

लोकअदालतीत शहर वाहतूक उपशाखा कल्याण विभागातील कसुरदारवाहन चालक व मालकां कडून एकूण २५२८ ई चलनातून १२ लाख ५४ हजार ७५० रुपये दंड वसूल केला ,शहर वाहतूक उपशाखा डोंबिवली विभागातील कसुरदारवाहन चालक व मालकां कडून एकूण २५९७ ई चलनातून १२ लाख ९ हजार ३५० रुपये दंड वसूल केला तर शहर वाहतूक उपशाखा कोळसेवाडी विभागातील कसुरदारवाहन चालक व मालकां कडून एकूण २०३६ ई चलनातून ९ लाख ८८ हजार ९ ५० रुपये दंड वसूल केला अश्या उप वाहतूक विभागाच्या तीन उप शाखां मिळून ७१६१ चलनांच्या ७१६१ प्रकरणा मध्ये तडजोडी करण्यात आल्या असून यातून तब्बल ३४ लाख ५३ हजार रुपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आल्याची माहिती व.पो.नी.महेश तरडे यांनी दिली लोक अदालीतीच्या माध्यमातून होणारी दंडवसुली वाहतूक शाखेला मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web