भारतात नेत्रदानाच्या जनजागृतीची आवश्यकता,नेत्रदान करण्याचे एएसजी नेत्र रूग्णालयाचे आवाहन

नेशन न्युज मराठी टिम.

डोंबिवली – भारतात वर्षाला एक लाखार्पयत नेत्रदान होण्याची गरज आहे. मात्र त्या तुलनेत नेत्रदान होत नाही. केवळ 25 हजार नेत्र शस्त्रक्रिया होत आहे. नेत्र शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असणारे टिश्यू किंवा बुबुळ नेत्र बॅकेत नसल्याने 75 हजार शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. त्यामुळे नेत्रदानाबाबत जनजागृती होण्याची गरज आहे. नागरिकांनी देखील मोठय़ा प्रमाणात नेत्रदान करावे असे आवाहान डॉ. विनायक दामगुडे यांनी केले आहे.

डोंबिवलीत एएसजी समूहाच्या नेत्र रूग्णालयाचे उद्घाघाटन करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विनायक यांनी उपरोक्त माहिती दिली. प्रत्येकाला सर्वात्तम नेत्रोपचार मिळावेत तसेच कोणाताही भेदभाव न करता समान उपचार पध्दती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने समूहाची स्थापना करण्यात आली. एएसजी आय समूहाचे 15 राज्यांमधील 38 शहरांमध्ये 44 रु ग्णालये कार्यरत आहेत. डोंबिवली येथील समूहाची ही पाचवी शाखा आहे. या पत्रकार परिषदेला डॉ. हरीश पाठक, डॉ. हर्षवर्धन रेड्डी सी. , डॉ. प्रमोद बी लेंडे उपस्थित होते.

विनायक दामगुडे म्हणाले, नेत्रदानाची प्रक्रिया अगदी सोपी आहे. या रुग्णालयात येणा:या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना नेत्रदानाविषयी माहिती देण्यात येणार आहे. त्यासाठी पत्रक देणे, रुग्णालयात फलक लावणे तसेच मौखिक पध्दतीने माहिती दिली जाणार आहे असे ही त्यांनी सांगितले.

डॉ. हरिश पाठक यांनी सांगितले, सध्याच्या पिढीला चष्मा लावणे आवडत नाही. त्यांना चांगला दिसायचे आहे. त्यामुळे चष्माचा नंबर काढण्यासाठी तरूणपिढी मोठया प्रमाणावर रुग्णालयात येते. चष्मा काढून टाकण्यासाठी दोन पध्दती आहेत. एक लेझर पध्दती आहे. त्यात लेझरच्या साहाय्याने वरच्या वर शस्त्रक्रिया केली जाते. दहा ते पंधरा मिनिटात ही होती. डोळ्य़ांच्या आत जावे लागत नाही. चांगला रिझल्ट देणारी ही शस्त्रक्रिया आहे. फारच कमी लोकांना लेन्स टाकावे लागते. तसेच लेन्समध्ये ही अनेक अॅडवान्स लेन्स आल्या आहेत. त्याचा ही वापर केला जातो. आर्थिक क्षमता नसलेल्या रुग्णांना देखील विशेष पॅकेजमध्ये उपचार करून दिले जातात. लहान मुलांमध्ये चष्मा लागण्याचे प्रमाण वाढत आहे. लहान मुलांची वेळोवेळी नेत्र तपासणी करण्याची गरज आहे. अनेकदा मुलांना चष्मा आहे पण ती गोष्ट त्यांना माहितीच नसते. परदेशात जन्मानंतर लगेचच आणि शाळेत जाण्यापूर्वी देखील नेत्र तपासणी केली जाते. पण आपल्याकडे तसे काही होत नाही, असे ही त्यांनी सांगितले.

त्यामुळे जर आपण वेळीच आपल्या डोळ्याची तपासणी केली तर आपले डोळे हे निरोगी राहू शकतात.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web