नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – मनसेला पुन्हा एकदा खिंडार पडले असून मनसेच्या माजी नगरसेविकेेसह १० जणांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी हा प्रवेश करण्यात आला. यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील उपस्थित होते.
आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काही आठवड्यांपर्वीच भाजपच्या काही नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यात आज मनसेमधूनही कल्याण ग्रामीण मतदारसंघातील माजी नगरसेविका पूजा गजानन पाटील यांच्यासह मनसे तालुका प्रमूख गजानन पाटील, मनसे जिल्हा सचिव प्रकाश माने, मनसेचे डोंबिवली शहर संघटक संजीव ताम्हाणे आदी पदाधिकाऱ्यांनीही मनसेला सोडचिठ्ठी देत आपल्या हाती शिव बंधन बांधले. मधल्या काळात भाजप पदाधिकारी आणि माजी नगरसेवकानी शिवसेनेत प्रवेश केला