नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – प्रभाग क्रं ११ बल्याणी प्रभाग अविकसित ग्रामीण प्रभाग असुन या प्रभागातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झाली होती.शिवसेनेच्या माध्यमातून कल्याण कुष्षी उत्पन्न बाजार समिती संचालक ,माजी नगरसेवक मयूर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी शिक्षण समिती सभापती नमिता मयूर पाटील यांनी विरोधकांना सणसणीत चपराक देत प्रभागातील मुख्य दोन रस्त्यासाठी तब्बल १० कोटी.७० लक्ष निधीची तरतूद पाठपुरवा करीत रस्त्याच्या पायाभूत सुविधा कामे मार्गी लावत विकास कामे म्हणजे काय हे करून दाखवले असल्याने डॉ. बाबासाहेब आं बेडकर चौक ते उंभर्णी गाव , डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते वैष्णव माता मंदिर टिटवाळा रोड हे दोन्ही मुख्य रस्ते लवकरच कात टाकणार आहेत. बल्याणी प्रभाग परिसर चाळीवजा स्लम् परिसर असुन ग्रामीण अविकसित असून रस्त्यांची समस्या अनेक वर्षे भेडसावत होती. या रस्त्याच्या संदर्भात माजी नगरसेवक मयूर पाटील आणि माजी नगरसेविका नमिता पाटील यांनी अनेकदा रस्त्याची समस्या प्रशासन कडे मांडली व पाठपुरावा देखील केला. मात्र विरोधात या रस्त्याच्या बाबतीत राजकरण करीत टिका टिप्पणी करीत दिशाभूल करीत आपण रस्त्याच्या प्रश्नाबाबत करणार असल्याच्या वल्गना करीत होते. अखेर माजी नगरसेवक पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले त्यांनी करून दाखविल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उंभर्णी गाव रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते गुरुवारी संध्याकाळी संपन्न झाला.
या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी प्रतिपादन केले की,”आम्ही शिवसैनिक आहोत घाबरत नाहीत, आम्हाला विनाकारण डिचवू नका, अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, गेली अनेक वर्षांपासून उंभरणी येथे चांगला रस्ता नव्हता, येथील नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागते, मात्र त्यांचा हा वनवास संपला असून पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार विश्वनाथभोईर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका नमिता पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून डांबरीकरण रस्तासाठी १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर करून घेतला आहे. त्याच्याच कामाचे भूमिपूजन आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर येथील आंबेडकर चौक ते वैष्णव देवी मंदिर पर्यंत ९.५० कोटी निधी मंजूर झाला असून पायाभूत सुविधांसाठी एकूण १० कोटी ७० लाख एवधी मोठीं निधी खेचून आणणारे पाटील दाम्पत्य हे ग्रामीण भागातील एकमेव नगरसेवक ठरले आहे. त्यामुळे येथील रस्ते कात टाकणार आहे.
महापालिका प्रभाग ११ बल्याणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते उभी रस्त्याची दुरवस्था झाली होती, खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे अशी अवस्था झाली होती. अनेक अपघातही झाले आहेत. येथील ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी व वाहनचालकांना खुपच त्रास सहन करावा लागत होता. याबाबत मा. नगरसेविका नमिता पाटील व माजी नगरसेवक मयुर पाटील यांचा सन २०१८ पासून महापालिका आयुक्त तसेच प्रशासन अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे व निधी अभावी काम थांबले होते. तर मध्यंतरी कोव्हिडचे सावट होते. परंतु नगरसेविका नमिता पाटील व माजी नगरसेवक मयुर पाटील यांचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाकडे सुरुच होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. डांबरीकरण रस्तासाठी निधी मंजूर करून घेतला आहे. यावेळी उपजिल्हा प्रमुख अरविंद मोरे, संघटक रवींद्र कपोते, विजय काटकर, सुरेश सोनार, शाखा प्रमुख शिवाजी गोंधळे, नामदेव बुटेरे, संतोष दळवी, अनंता पाटील, आरफात गुजर, विवेक शिंदे, रोहन कोट, जावेद भाई, संदीप पाटील, मुसदर रईस, उल्हर महाराज, विनोद शिंदे, प्रमोद पवार, महेश पाटील, भरत मढवी, दशरथ गायकर आदी उपस्थित होते.