नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण – एन आर सी स्कूल मोहने काँलनी येथील शाळेत शिकलेल्या दहावी बँच १९८५ माजी विद्यार्थ्यांचा मेळावा येत्या रविवारी म्हणजे ८ मे रोजी संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे ,गावे यासह गोवा राज्यासह परराज्यात नोकरी ,व्यवसाया निमित्ताने राहत असलेले १९८५ दहावी बँचचे विद्यार्थी व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येणार आहे. तब्बल ३७ वर्षोनी आपल्या शाळेत येत आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत एकत्र येत सवांद साधणार असल्याने वयाची पन्नाशी ओलंडलेल्या या माजी विघार्थ्या मध्ये यामुळे उत्साहाचे चैतन्य निर्माण झाले आहे.

१९८५ दहावी बँचचे काही विद्यार्थी इंजिनिअर, शिक्षक ,कारपेरेट क्षेत्रात आधिकारी सरकारी आधिकारी ,डी.वाय् एस् पी या मोठ्या अधिकारी पदा पर्येंत गेले असुन काही विद्यार्थी परदेशी नोकरी करीत आहेत. या माजी विद्यार्थ्यांनी व्हाँटस् ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत संवाद साधत कोरोना काळात ऐकमेकांना दिलासा देत आपुलकी ने एकमेकाची विचारपूस करीत शालेय मैत्रीचा अमुल्य ठेवा असलेला वसा सुरु ठेवला आहे.
एन् आर् सी कंपनी बंद होऊन तब्बल सुमारे १४ वर्षे झाली. एन् आर् सी काँलनी वसाहतीला गत वैभव गेले आहे. परंतु एन् आर् सी शाळा मात्र सुरू ठेवण्यासाठी एन् आर् सी शाळेचे रजिस्टर नाईक सर यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.नाईक सर यांनी माजी विद्यार्थी मेळावा दिंनाक ८ मे रविवारी रोजी शाळेत घेण्यास परवानगी दिली असल्याने माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न होणार यात तीळ मात्र शंका नाही. या मेळाव्यासाठी सुमारे ७५ माजी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. आपल्या शालेय मैत्रीचा वसा व्हाटस् अँप्स् ग्रुपच्या माध्यमातून पुढाकार घेणारे माजी विघार्थी रवि कवडे, अविनाश नेवे रवि साठे, तानाजी लावंड,दिलिप सदाफुले
दीपक मोहिते,दिपक कापडे,अरुण सालगुडे, शैलेश मांगले, शरद जावळे, राजेश कोळी आणि सहकारी यांचे योगदानामुळे शालेय मैत्रीची नाळ या ग्रुपच्या माध्यमातून जोडली गेली आहे. व पुढेही अशीच जोडलेली राहणार आहे.