सतरावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २९मे ते ४ जून दरम्यान होणार

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई -सतरावा मिफ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महिन्याच्या अखेरीस (29 मे ते 4 जून) सुरु होणार आहे. त्या आधी, मे महिन्यात चित्रपटविषयक अनेक कार्यक्रमांची रेलचेल आपल्याला बघायला मिळेल.

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने या महान दिग्दर्शकाला अभिवादन करण्यासाठी विविध उपक्रम सुरु केले आहेत. याचाच भाग म्हणून, भारतात विविध ठिकाणी सत्यजित रे चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. याअंतर्गत, सत्यजित रे यांचे काही निवडक चित्रपट नवी दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू आणि पुणे या शहरात  2, 3 आणि 4 मे 2022 रोजी दाखवले जाणार आहेत. 

रे यांच्या चित्रपटांचा पुष्पगुच्छ

अपराजितो हा सत्यजित रे यांचा चित्रपट 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय, एनएफडीसीने निर्मित केलेले ‘आगंतुक’, ‘घरे-बाइरे’, ‘गानशत्रू’ हे सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट दाखवले जातील. तसेच, उपलेनदू चक्रवर्ती यांनी दिग्दर्शित केलेला “म्युझिक ऑफ सत्यजित रे” चित्रपट, अनिर्बान मित्रा आणि तीर्थो दासगुप्ता यांनी दिग्दर्शित केलेला ‘नेमय घोष-ए रे ऑफ लाईट’ हा चित्रपट, फिल्म्स डिव्हिजनचे माहितीपट आणि लघुपट, ‘इनर आय’, रविंद्रनाथ ठाकूर यांच्या आयुष्यावरील रे यांचा चित्रपट, श्याम बेनेगल यांनी दिग्दर्शित केलेला  ‘सत्यजित रे’ हा चित्रपट. बी. डी गर्ग यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘क्रिएटिव्ह आर्टिस्ट ऑफ इंडिया-सत्यजित रे’ हा माहितीपट देखील दाखवला जाईल. त्याशिवाय, एनएफएआयने नव्यानेच संवर्धन केलेले सत्यजित रे दिग्दर्शित चित्रपट- जसे की ‘सोनार केल्ला’, ‘सीमाबद्ध,’ ‘हिरक हजार देशे ‘दाखवले जाणार आहेत. पश्चिम बंगालमधील सत्यजित रे यांचा लोकप्रिय ‘पथेर पांचालीच्या ‘चित्रपटाच्या मूळ निगेटिव्ह आगीत नष्ट झाल्या होत्या.  पश्चिम बंगाल सरकारने त्यांचे पुनरसंवर्धन केले आहे, त्याचेही या महोत्सवात प्रदर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय, ‘अपराजितो’, ‘जलसाघर’ हे सत्यजित रे यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट देखील दाखवले जातील.

SL NOPRODUCERFILMS LIST 
1IndependentAparajito (Dir: Anik Dutta) –  150 Min  IndependentOPENING FILMOnly at NMIC
2NFDCAgantuk (Dir: Satyajit Ray) – 115 Min NFDC – 
3FDCreative Artists of India – Satyajit Ray (Dir: B D Garga) – 14 Min FD 
4IndependentJalsaghar (Dir: Satyajit Ray) – 100 Min Independent 
5IndependentNemai Ghosh – A Ray of Light (Dir: Anirban Mitra & Tirtha Dasgupta) – 48 Min NFDC 
6NFDCMusic of Satyajit Ray (Dir: Utpalendu Chakraborty) – 51 Min NFDC 
7FDRabindranath Tagore (Dir: Satyajit Ray) – 54 Min FD 
8IndependentAparajito (Dir: Satyajit Ray) – 127 Min Independent (Part of Apu-Triology) 
9FDSatyajit Ray (Dir: Shyam Benegal) – 136 Min FD 
10FDInner Eye (Dir:Satyajit Ray) – 20 Min FD 
11Government of West BengalPather Panchali (Dir: Satyajit Ray) – 126 Min Govt. of West Bengal (Part of Apu-Triology)CLOSING FILM  at all Venues
12NFDCGhare Baire (Dir: Satyajit Ray) – 140 Min NFDC 
13NFDCGanashatru (Dir: Satyajit Ray) – 95 Min NFDC 
14DDSadgati (Dir: Satyajit Ray) – 52 Min Doordarshan 
15NFAISonar Kella (Dir: Satyajit Ray) -136 Min – NFAI 
16NFAIHirak Rajar Deshe (Dir: Satyajit Ray) – 118 Min – NFAI 
17NFAISeemabadha (Dir: Satyajit Ray) 113 Min – NFAI 

मुंबईतल्या भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने एनएफडीसी, फिल्म्स डिव्हिजन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि दूरदर्शन यांच्या सहकार्याने तसेच पश्चिम बंगाल सरकार आणि अरोरा फिल्म कॉर्पोरेशन अँड फ्रेंडस कम्युनिकेश यांच्या मदतीने हा चित्रपट महोत्सव आयोजित केला आहे.

रेड कारपेट ने या चित्रपट महोत्सवाची सुरुवात होणार असून त्यानंतर श्याम बेनेगल यांच्या हस्ते 2 मे रोजी सकाळी दहा वाजता सत्यजित रे तात्पुरत्या दालनाचे उद्घाटन केले जाणार आहे.

SCREENING VENUES

MUMBAI
National Museum of Indian Cinema, Auditorium I & II, Films Division, 24, Dr. G. Deshmukh Marg (Peddar Road),
Mumbai – 400026, Maharashtra Tel :- 23551461/23551463
NEW DELHI
Films Division Auditorium, 1, Mahadev Road, Connaught Place,
New Delhi – 110001. Tel :- 011-23716213
CHENNAI
Tagore Film Centre, Music College Road, State Bank of India Colony, Raja Annamalai Puram,
Chennai – 600028, Tamil Nadu Tel :- 044 2462 2939
KOLKATA
Indian Museum, Ministry of Culture, GOI, 27, Jawaharlal Nehru Road, Fire Brigade, Head Quarter, Dharmatala, Taltal
Kolkata – 700016, West Bengal. Tel :- 033 24235046
BENGALURU
Shruthi Auditorium, Films division, B Wing 6th Floor, Kendriya Sadan, Sr Administrative officer, Koramangala,
Bangalore – 5600034, Karnataka
PUNE
National Film Archives of India, NFAI Main Theater / Auditorium, Law college road,
Pune – 411004, Maharashtra. Tel :- 020 29809379

यावेळी सिनेमाचे प्रदर्शन विनामूल्य असेल. तसेच प्रेक्षकांना सत्यजित रे यांच्या कारकीर्दीतील महत्वाचे चित्रपट एकाच वेळी बघता येईल. तसेच मोठ्या पडद्यावर या चित्रपटांचा आनंद घेता येईल.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे व्यवस्थापकीय संचालक,  रविंद्र भाकर यांनी सांगितले की, देशात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असतांना, सत्यजित रे यांची जन्मशताब्दी साजरी करता येणे, हा मोठा सन्मान आहे. तसेच, यानिमित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रे यांच्यावरील एक विशेष दालन खुले केले जाणार आहे. लोकांनी विविध प्रकारे रे यांच्या चित्रपटांचा आस्वाद घेतला आहे. मात्र, तरीही, आज आम्ही रे यांच्या चित्रपटांच्या चाहत्यांना त्यांचे चित्रपट मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी देत आहोत. दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरू, पुणे इथे 2 ते 4 मे 2022 या काळात हे चित्रपट दाखवले जातील. यात, एनएफएआय ने नव्याने संवर्धित केलेल्या चित्रपटांचाही समावेश असेल.”

उद्घाटन कार्यक्रमानंतर लगेचच, ‘अपराजितो’ चित्रपटाचा प्रीमियर शो केला जाईल.  

चर्चासत्र:

चार मे 2022 रोजी, दुपारी चार वाजता पथेर पांचाली या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर, (सत्यजित रे यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट) चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे, या चर्चासत्राने महोत्सवाचा समारोप होईल. एनएफडीसी च्या अधिकृत फेसबुक पेजवरुन ह्या चर्चासत्राचे थेट प्रसारण केले जाईल, ज्यातून रसिक घरबसल्या त्याचा आनंद घेऊ शकतील. श्याम बेनेगल, बरुन चंदा (रे यांच्या सीमाबंद चित्रपटातील कलाकार) आणि शंतनू मोईत्रा हे ह्या चर्चासत्रात आपले विचार मांडतील तर सूत्रसंचालन शंखायन घोष करतील.

सतरावा मिफ म्हणजेच मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या 29 मे ते 4 जून दरम्यान, फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात होणार आहे.

भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय  (NMIC)

हे संग्रहालय दोन इमारतींमध्ये आहे- नवी इमारत आणि 19 व्या शतकातील ऐतिहासिक राजवाडा- गुलशन महल, दोन्ही इमारती फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरातच आहेत.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाविषयी (NFDC)

भारतात सिनेमा आणि सिनेमाशी संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, 1975 साली राष्ट्रीय चित्रपट महामंडळाची स्थापना केली. 

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web