२१८ कोटीच्या बनावट बिला प्रकरणी उल्हासनगर येथे तिघांना अटक

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.

त्यानंतर 25एप्रिल 2022 रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या   मे. एम्पायर एंटरप्राइजेस, M/S. शंकर एंटरप्रायझेस आणि M/S. M M Enterprises. या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी भेटी करण्यात आल्या. या सर्व करदात्यांनी घरोघरी गोळा केलेली वीज बिले यासारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच, त्यांना अंधारात ठेवून भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे तपासणी भेटीच्या वेळी आढळून आले.

या करदात्यांनी 218.26  कोटी रू किंमतीच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या  इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थींना 39.28 कोटींचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले. याप्रकरणी 29 एप्रिल 2022 रोजी महानगर दंडाधिकारी यांनी मे. शंकर एंटरप्रायझेसचे मालक शंकर आप्पा जाधव, (वय 37), मे. एम्पायर एंटरप्रायझेसचे मालक बापू वसंत वाघमारे, (वय 36), आणि दस्तऐवज संकलन एजंट आदेश मधुकर गायकवाड, (वय 36) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

या तपासाची मोहीम श्री.राहुल द्विवेदी (आयएएस), राज्य कर सहआयुक्त, अन्वेषण-ए आणि श्री. संजय व्ही. सावंत, उपअभियंता. राज्य कर आयुक्त (DC-E-002) राज्य कर सहायक आयुक्त, श्री. गिरीश पी. पाटील, श्री. राहुल एच. मोहोकर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कर विभागाचे इतर सहायक आयुक्त व राज्य कर निरीक्षक यांनी राबवली.

या आर्थिक वर्षात राज्य जीएसटी विभागाने आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे. याव्दारे थकबाकीदार आणि करचोरी करणा-यांना, दोषींना पकडण्यात कोणतीही कसर सोडणार नसल्याचा कडक इशारा विभागाने दिला आहे.

Share via

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020 Nation News Marathi | All Rights Reserved | Designed By - Way For Web